For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘अग्नि प्राईम’ची यशस्वी चाचणी

03:36 PM Apr 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘अग्नि प्राईम’ची यशस्वी चाचणी
Advertisement

सीडीएस चौहान यांच्यासह लष्कराचे उच्च अधिकारीही उपस्थित : नवीन पिढीचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र : एकाचवेळी शत्रूचे अनेक अ•s उद्ध्वस्त करण्यास सक्षम

Advertisement

‘अग्नि प्राईम’ची वैशिष्ट्यो...

  • 11000 किलो        क्षेपणास्त्राचे वजन
  • 2,000 किमी         लक्ष्य करण्याची क्षमता
  • 34.5 फूट               क्षेपणास्त्राची लांबी

वृत्तसंस्था /भुवनेश्वर

Advertisement

देशाच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडने (एसएफसी) डीआरडीओच्या सहकार्याने अग्नि-प्राईम या नवीन पिढीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. बुधवारी संध्याकाळी 7 वाजता ओडिशातील डॉ. एपीजे कलाम बेटावरून याचे प्रक्षेपण करण्यात आले. या चाचणीवेळी क्षेपणास्त्राने सर्व चाचणी उद्दिष्टे पूर्ण केली. या प्रक्षेपणावेळी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांच्यासह डीआरडीओ आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अग्नि-प्राईम क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे. एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत अग्नि प्राईम क्षेपणास्त्र स्वदेशी विकसित करण्यात आले आहे. यापूर्वी गेल्यावषी 7 जून रोजीही डीआरडीओने या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. आता 3 एप्रिल रोजी झालेली आणखी एक चाचणी पूर्णपणे यशस्वी झाल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने गुऊवारी जाहीर केले. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 2,000 किमी इतकी असून ते एकाचवेळी अनेक लक्ष्ये नष्ट करू शकते. क्षेपणास्त्राच्या यापूर्वीच्या यशस्वी विकास चाचण्यांनंतर ‘अग्नि प्राईम’चे प्री-इंडक्शन रात्रीचे प्रक्षेपण झाले. अशाप्रकारचे प्रक्षेपण प्रणालीच्या अचूकतेची आणि विश्वासार्हतेची पुष्टी करते. चाचणीदरम्यान रडार, टेलिमेट्री आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टीम यासारखी उपकरणे जहाजांवर उ•ाणाचा डेटा पॅप्चर करण्यासाठी विविध ठिकाणी तैनात करण्यात आली होती. डीआरडीओ आणि स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही चाचणी पाहिली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यशस्वी चाचणीबद्दल डीआरडीओ, एसएफसी आणि लष्कराचे अभिनंदन केले. या क्षेपणास्त्राचा लष्करात समावेश झाल्याने सुरक्षा दलाची ताकद वाढेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तसेच या चाचणीच्या यशानंतर या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा सशस्त्र दलात समावेश करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एकाचवेळी अनेक स्फोटके डागण्याची क्षमता

‘अग्नि प्राईम’ क्षेपणास्त्र हे अग्नि मालिकेतील नवीन पिढीचे क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राचे वजन 11,000 किलो असून लांबी 34.5 फूट इतकी आहे. या क्षेपणास्त्रावर एकाचवेळी एक किंवा अनेक मल्टिपल इंडिपेंडन्टली टार्गेटेबल रीएंट्री व्हेईकल (एमआयआरव्ही) म्हणजेच स्फोटके (वॉरहेड्स) बसविण्याची सुविधा आहे. ‘अग्नि प्राईम’ला 4,000 किमी रेंजसह अग्नि-4 आणि 5000 किमीच्या श्रेणीसह अग्नि-5 च्या तांत्रिक वैशिष्ट्यांसह डिझाईन केल्यामुळे त्याचे तंत्रज्ञान खूप प्रगत आहे. नवीन क्षेपणास्त्र वजनाने हलके असून ते मोबाईल लाँचरवरूनही डागता येते. ‘अग्नि प्राईम’ क्षेपणास्त्र द्विस्तरीय यंत्रणेद्वारे चालवले जात असून ते घन इंधनावर आधारित आहे.

Advertisement
Tags :

.