For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

70 वर्षीय वृद्धावर ‘सायटस इन्व्हर्सस’वर यशस्वी उपचार

10:35 AM Nov 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
70 वर्षीय वृद्धावर ‘सायटस इन्व्हर्सस’वर यशस्वी उपचार
Advertisement

सेंट्रा केअर हॉस्पिटलची कामगिरी : डॉ. शाहबाज पटेल यांच्या नेतृत्त्वाखाली उपचार

Advertisement

बेळगाव : सेंट्रा केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 70 वर्षीय वृद्धावर सायटस इन्व्हर्सस या गुंतागुंतीच्या आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णाला अशक्तपणा व श्वासोच्छवासाचा त्रास होऊन छातीत दुखत होते. सदर रुग्ण मुनवळ्ळी (ता. सौंदत्ती) येथील आहे. हृदयरोगतज्ञ डॉ. शाहबाज पटेल व त्यांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली.

सदर वृद्धाला अचानकपणे भरपूर घाम येऊन सामान्य अशक्तपणा व श्वसनाचा मोठा त्रास झाला. यानंतर रुग्णाला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी रुग्णाची प्राथमिक तपासणी केल्यानंतर रुग्णाला हृदयविकाराचा झटका आल्याचे आढळून आले. यानंतर तेथील रुग्णांनी अधिक उपचारासाठी बेळगाव येथील सेंट्रा केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले. यानंतर नातेवाईकांनी वृद्धाला तात्काळ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सेंट्रा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

Advertisement

या हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी केलेल्या रुग्णाच्या तपासणीत रुग्णाचे हृदय उजव्या बाजूला, यकृत डाव्या बाजूला तर पोट उजव्या बाजूला असल्याचे दिसून आले. यामुळे उपचारासाठी शारीरिक आव्हान निर्माण झाले होते. मात्र धोका पत्करून डॉ. शाहबाज पटेल यांनी रुग्णाची अँजिओग्राफी केली. यामध्ये त्यांना रुग्णाच्या उजव्या धमनीमध्ये ब्लॉकेज असल्याचे दिसून आले. यानंतर डॉ. पटेल व त्यांच्या पथकाने मिरर-इमेज अनाटॉमी यशस्वी करून रुग्णावर अँजिओप्लास्टी केली. तसेच प्लेक काढून टाकून यशस्वीपणे स्टंट बसविला.

सायटस इन्व्हर्सस ही एक अत्यंत दुर्मीळ स्थिती असून अँजिओप्लास्टी करणे गुंतागुंतीचे व आव्हानात्मक बनते. मात्र डॉ. पटेल व त्यांच्या पथकाने धोका पत्करून यशस्वीपणे ही शस्त्रक्रिया पूर्ण केली. रुग्णाला दोन दिवस अतिदक्षता विभागात देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. मात्र रुग्णाला पुढील उपचारास प्रतिसाद दिल्याने दुसऱ्या दिवशी त्याला डिस्चार्ज देण्यात आल्याचे डॉ. पटेल यांनी सांगितले.

या यशामुळे हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालिका नीता देशपांडे यांनी डॉ. पटेल व त्यांच्या पथकाचे कौतुक करत, ही दुर्मीळ व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आपल्या डॉक्टरांनी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. या कामगिरीमुळे हॉस्पिटलचा नावलौकिक झाला असून सर्वसामान्यांचा विश्वास संपादन केल्याचे सांगितले. रुग्णाच्या कुटुंबीयांनी रुग्णाला जीवदान दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Advertisement
Tags :

.