कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मिलिट्री कॉम्बॅट पॅराशूटचे यशस्वी परीक्षण

07:00 AM Oct 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वायुदलाकडून 32 हजार फुटांच्या उंचीवरून सिस्टीमचे परीक्षण : डीआरडीओची मोठी कामगिरी

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

डीआरडीओने प्रभावी तंत्रज्ञान आणि क्षमतेने युक्त मिलिट्री कॉम्बॅट पॅराशूट सिस्टीम विकसित केली आहे. ही मिलिट्री कॉम्बॅट पॅराशूट सिस्टीम 32 हजार फुटांच्या उंचीवरही यशस्वी ठरली आहे. या कॉम्बॅट पॅराशूटद्वारे 32 हजार फुटांच्या उंचीवर यशस्वी कॉम्बॅट फ्री-फॉल जम्प परीक्षण करण्यात आले आहे. या परीक्षणासोबत डीआरडीओने नवा विक्रमही नोंदविला आहे.

ही उडी भारतीय वायुदलाच्या टेस्ट जम्पर्सकडून पूर्ण करण्यात आली, यामुळे या स्वदेशी प्रणालीची विश्वसनीयता, कार्यकुशलता आणि प्रगत डिझाइनचे प्रमाणन झाले. संरक्षण मंत्रालयानुसार या कामगिरीसोबत मिलिट्री कॉम्बॅट पॅराशूट सिस्टीम वर्तमानात भारतीय सशस्त्र दलांकडून वापरण्यात येणारी एकमात्र अशी पॅराशूट सिस्टीम ठरली आहे, जी 25 हजार फुटांपेक्षा अधिक उंचीवरही तैनात केली जाऊ शकते.

स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित या मिलिट्री कॉम्बॅट पॅराशूट सिस्टीममध्ये अनेक वैशिष्ट्यो आहेत. ही प्रणाली डीआरडीओच्या दोन प्रयोगशाळा एरियल डिलिव्हरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, आगरा तसेच डिफेन्स बायोइंजिनियरिंग अँड इलेक्ट्रोमेडिकल लेबोरेट्री बेंगळूर कडून संयुक्त स्वरुपात विकसित करण्यात आली आहे.

मिलिट्री कॉम्बॅट पॅराशूटची वैशिष्ट्यो

मिलिट्री कॉम्बॅट पॅराशूट सिस्टीममध्ये अनेक अत्याधुनिक सामरिक वैशिष्ट्यो सामील आहेत. यात कमी अवतरण दर, ज्यामुळे सैनिक अधिक सुरक्षितपणे उतरू शकतात. याच्या श्रेष्ठ संचालन क्षमतेमुळे पॅराट्रूपर अचूक दिशानियंत्रण करू शकतात. पूर्व-निर्धारित उंचीवर सुरक्षित पॅराशूट तैनाती आणि निर्धारित लँडिंग झोनवर अचूक अवतरण या सिस्टीममुळे शक्य होते, असे डीआरडीओचे सांगणे आहे. ही प्रणाली नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशनसोबत संलग्न असल्याने भारताला पूर्ण स्वायत्तता प्राप्त होते, यामुळे हे कुठल्याही बाहेरील हस्तक्षेप किंवा तसेच अडथळ्यापासून अप्रभावित राहत असल्याचे संरक्षण मंत्रालयाचे सांगणे आहे. संरक्षण मंत्रालय या सिस्टीमला आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठे पाऊल मानत आहे.

विदेशी निर्भरता कमी होणार

संरक्षण मंत्रालयानुसार मिलिट्री कॉम्बॅट पॅराशूट सिस्टीमच्या यशस्वी परीक्षणाने स्वदेशी पॅराशूट प्रणालींच्या व्यापक उपयोगाचा मार्ग प्रशस्त झाला आहे. ही मिलिट्री कॉम्बॅट पॅराशूट प्रणाली कमी देखभाल वेळ आणि खर्चामुळे आयात उपकरणांच्या तुलनेत अधिक उपयुक्त ठरणार आहे. तसेच संघर्ष किंवा युद्धाच्या स्थितीत विदेशी निर्भरताही कमी करणार आहे.

संरक्षण मंत्रालयाकडून अभिनंदन

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या कामगिरीवर डीआरडीओ, सशस्त्र दल आणि भारतीय उद्योगजगताचे अभिनंदन केले आहे. भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमतांमध्ये हे परीक्षण ऐतिहासिक मैलाचा दगड असल्याचे उद्गार राजनाथ सिंह यांनी काढले आहेत. तर संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव तसेच डीआरडीओ अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनी या परीक्षणाशी संबंधित डीआरडीओ टीमचे कौतुक करत हे एरियल डिलिव्हरी सिस्टीममध्ये आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे वक्तव्य केले आहे. हे यश भारताची तांत्रिक उत्कृष्टता, स्वदेशी नवोन्मेष आणि आत्मनिर्भर संरक्षण क्षमतेचे प्रतीक असून ते सशस्त्र दलांच्या संचालन क्षमतेला नवा आयाम प्रदान करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article