For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वदेशी नेव्हल सरफेस गनचे यशस्वी परीक्षण

07:00 AM May 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
स्वदेशी नेव्हल सरफेस गनचे यशस्वी परीक्षण
Advertisement

वृत्तसंस्था/कोलकाता

Advertisement

युद्धनौका निर्माता संरक्षण पीएसयू गार्डनरीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड (जीआरएसई), कोलकाताने आता शस्त्रास्त्रनिर्मितीच्या क्षेत्रात पाऊल टाकताना नौदलासाठी पहिल्यांदाच स्वदेशनिर्मिती 30 एमएम नेव्हल सरफेस गनचे यशस्वी सागरी परीक्षण  केले आहे. स्वदेशी इलेक्ट्रो ऑप्टिकल फायर कंट्रोल सिस्टीमचा वापर करून अचूक निशाणा साधत याचे यशस्वी परीक्षण करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. जीआरएसईकडून डिझाइन आणि निर्मित अँटी-सबमरीन वॉरफेयर शॅलो वॉटर क्राफ्टपैकी एकावर करण्यात आलेले यशस्वी सागरी परीक्षण जीआरएसईसाठी मैलाचा दगड आहे, कंपनी युद्धनौका निर्माण करण्यासह एक सक्षम शस्त्रास कंपनी होण्याच्या दिशेने अग्रेसर आहे.

भारतीय नौदलाकडुन ऑर्डर

Advertisement

ही महत्त्वपूर्ण कामगिरी जीआरएसई आणि बीएचएसईएल (हैदराबाद)सोबत एल्बिट सिस्टीम्स लँडदम्यान अत्यंत मजबूत भागीदारीमुळे शक्य झाली, या कंपन्या गन प्रकल्पासाठी तंत्रज्ञान आणि उत्पादन भागीदार आहेत. भारतीय नौदलाने जीआरएसईला पहिल्यांदाच 30 एमएमच्या 10 स्वदेशी नेव्हल सरफेस गन्ससाठी ऑर्डर दिली होती.

कुठे होणार वापर?

सरफेस गन युद्धनौकांमध्ये वापरल्या जातात आणि त्या अत्यंत शक्तिशाली असतात. 30 मिमी नेव्हल गन मुख्यत्वे छोट्या जहाजांवर प्राथमिक अस्त्राच्या स्वरुपात तसेच मोठ्या जहाजांवर वेगाने येणाऱ्या पृष्ठभागीय धोक्यांना रोखण्यासाठी द्वितीयक अस्त्र म्हणून स्थापित केली जाणार आहे. या सरफेस गनला व्यापक सागरी परीक्षणांपूर्वी प्रकल्पात कठोर गुणवत्ता तपासणीला सामोरे जावे लागले आहे. गन सिस्टीम अचूक आणि विश्वसनीय आहे आणि ही भारतीय नौदलाच्या तांत्रिक स्वरुपात प्रभावी शस्त्र प्रणालींच्या ताफ्यात एक अत्यंत शक्तिशाली ठरेल.

नवा व्यावसायिक विभाग स्थापन

संरक्षण निर्मितीत आत्मनिर्भरतेच्या दिशेने स्वत:च्या प्रयत्नांच्या अंतर्गत जीआरएसईने 30 मिमी नेव्हल सरफेस गन यासारख्या प्रगत शस्त्र प्रणालीच्या स्वदेशीकरणासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे. याकरता कंपनीने नवा व्यावसायिक विभाग स्थापन केला असून तो नौदल आणि तटरक्षक दलासाठी इलेक्ट्रो-ऑप्टिकल फायर कंट्रोल सिस्टीमने युक्त नेव्हल गनची निर्मिती आणि पुरवठा करणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे.

Advertisement
Tags :

.