कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘प्रलय’ क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण

06:43 AM Jul 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

डीआरडीओकडून विकसित : ओडिशा किनाऱ्यावरून सिद्ध केली मारकक्षमता

Advertisement

वृत्तसंस्था/ बालासोर

Advertisement

डीआरडीओने ओडिशाच्या किनाऱ्यापासून काही अंतरावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून ‘प्रलय’ क्षेपणास्त्राची दोन यशस्वी उ•ाण परीक्षणे केली आहेत. ही परीक्षणे वापरकर्ता मूल्याकंनाचा हिस्सा होती आणि किमान मर्यादा क्षमतांची पडताळणी या परीक्षणाद्वारे करण्यात आली आहे.

दोन्ही क्षेपणास्त्रांनी स्वत:च्या निर्धारित प्रक्षेप पथाचे अचूकपणे अनुसरण केले आणि निर्धारित लक्ष्यावर अचूक प्रहार केला आहे. परीक्षणांदरम्यान क्षेपणास्त्रांची कामगिरी ही निकषांची पूर्तता करणारी राहिल्याने प्रणालीची संचालन तत्परता आणि विश्वसनीयतेची पुष्टी झाल्याचे डीआरडीओकडून सांगण्यात आले.

प्रलय एक कमी पल्ल्याचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असून ते खास स्वरुपात युद्धक्षेत्रावर वापरासाठी डिझाइन करण्यात आले आहे. या क्षेपणास्त्रामुळे भारतीय भूदल आणि वायुदलाच्या सामर्थ्यात भर पडणार आहे. या क्षेपणास्त्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

प्रलय क्षेपणास्त्र जवळपास 350-700 किलोग्रॅम वजनाचे पारंपरिक शस्त्र वाहून नेऊ शकते आणि कमांड सेंटर, लॉजिस्टिक हब आणि वायुतळ यासारख्या शत्रूच्या प्रमुख लक्ष्यांवर अचूकपणे हल्ला करू शकते.

मारक पल्ला

डीआरडीओकडून विकसित या क्षेपणास्त्राचा मारकपल्ला 150-500 किलोमीटर आहे, हे क्षेपणास्त्र टॅक्टिकल आणि स्टॅटेजिक दोन्ही स्थानांवर निशाणा साधण्यास सक्षम आहे. प्रलय क्षेपणास्त्रात ठोस इंधनयुक्त रॉकेट मोटर लावण्यात आले असून यामुळे डागण्यात येताच याचा वेग वाढणार आहे.

सीमावर्ती क्षेत्रांमध्ये तैनात करता येणार

प्रलय क्षेपणास्त्राला संवेदनशील सीमावर्ती क्षेत्रांमध्ये तैनात करता येणार आहे. हे क्षेपणास्त्र भारताच्या ‘प्रथम वापर न करण्याच्या’ आण्विक धोरणांच्या अंतर्गत पारंपरिक हल्ल्यांसाठी विकसित करण्यात आले आहे. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्रांच्या वापराशिवाय शक्तिशाली प्रतिक्रिया देऊ शकते. प्रलय क्षेपणास्त्र भारताच्या सीमा खासकरून प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि नियंत्रण रेषेवर स्थिती मजबूत करणार आहे.

प्रलय क्षेपणास्त्रामुळे होणारे सामरिक लाभ

वेगाने प्रत्युत्तर : क्षेपणास्त्राला 10 मिनिटांपेक्षा कमी वेळेत डागता येऊ शकते, हे क्षेपणास्त्र सीमेवर तणावावेळी उपयुक्त ठरणार.

डिटरेन्स अन् कंट्रोल : हे क्षेपणास्त्र शत्रूला घाबरविण्यास अन् युद्धाला नियंत्रित करण्यास मदत करेल, खासकरून शॉर्ट-रेंज कॉम्बॅटमध्ये.

अचूकता : अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असल्याने हे शत्रूच्या महत्त्वपूर्ण ठिकाणांना अचूकपणे लक्ष्य करू शकते.

सहज तैनात करता येणार : ट्विन लाँचर आणि हाय-मोबिलिटी व्हीकलमुळे याला सीमेवर लवकर तैनात करता येऊ शकते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article