For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निर्भय क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

07:00 AM Apr 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
निर्भय क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
Advertisement

भारताच्या या क्षेपणास्त्राने हादरणार चीन-पाकिस्तान, रडारला फसवण्यात माहीर

Advertisement

निर्भय...

  • क्षेपणास्त्राची लांबी               6 मीटर
  • क्षेपणास्त्राची ऊंदी               0.52 मीटर
  • पंखांची एकूण लांबी             2.7 मीटर

वृत्तसंस्था/भुवनेश्वर

Advertisement

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) गुरुवार, 18 एप्रिल  रोजी स्वदेशी इंजिनसह निर्भय क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. हे क्षेपणास्त्र प्रक्षेपकाद्वारे समुद्र आणि जमिनीवरून डागता येते. सैन्यात सामील झाल्यानंतर ही क्षेपणास्त्रे चीनच्या एलएसी सीमेवर तैनात केली जातील अशी अपेक्षा आहे. या क्षेपणास्त्रात स्वदेशी इंजिन बसवल्याने त्याची ताकद आणखी वाढली आहे. यादरम्यान, रेंज सेन्सर्स, इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टम आणि टेलिमेट्री कीजद्वारे क्षेपणास्त्राचा संपूर्ण मार्ग ट्रॅक करण्यात आला.हवाई दलाच्या सुखोई एसयु-30-एमके-1 या फायटर जेटनेही या क्षेपणास्त्राच्या उ•ाणाचा मागोवा घेतला. या क्षेपणास्त्राने चाचणीच्या सर्व मानकांची पूर्तता केली. यादरम्यान, त्याने समुद्रातील स्किमिंग म्हणजेच समुद्रावर कमी उंचीवर उ•ाण करण्याचे प्रात्यक्षिक यशस्वीपणे पूर्ण केले. चाचणीदरम्यान निर्भय क्षेपणास्त्राने ताशी 864 किमी ते 1,111 किमी इतका वेग गाठला. या क्षेपणास्त्रात भूप्रदेशातील लक्ष्य अचूकपणे टिपण्याची क्षमताही आहे. डीआरडीओने ओडिशातील चांदीपूर येथे निर्भय क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. यावेळी स्वदेशी तंत्रज्ञान व्रुझ मिसाईल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. निर्भय क्षेपणास्त्रात पहिल्या टप्प्यात घन इंधन आणि दुसऱ्या टप्प्यात द्रवरूप इंधन वापरण्याची सुविधा आहे. हे क्षेपणास्त्र 300 किलोपर्यंत पारंपरिक शस्त्रे वाहून नेऊ शकते. त्याची मारक क्षमता 1,500 किमी इतकी आहे. ते जमिनीपासून किमान 50 मीटर आणि जास्तीत जास्त 4 किमीवर उ•ाण करून लक्ष्य नष्ट करू शकते. तसेच वाटेत आपली दिशा बदलण्याची क्षमता त्यात असल्यामुळे अस्थिर लक्ष्यालाही ते अचूकपणे भेदू शकते. तसेच शत्रूचे लक्ष्य नष्ट करण्यापूर्वी, त्याचे छायाचित्र आणि व्हिडिओ पॅप्चर करून ते नियंत्रण कक्षाला पाठवण्याची सुविधाही त्यात उपलब्ध आहे. या क्षेपणास्त्रात स्वदेशी माणिक टर्बोपॅन इंजिन वापरण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.