For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भव्य सीता मंदिर बांधणार ! बिहारच्या सभेत अमित शहांचं जनतेला आश्वासन

05:56 PM May 16, 2024 IST | Abhijeet Khandekar
भव्य सीता मंदिर बांधणार   बिहारच्या सभेत अमित शहांचं जनतेला आश्वासन
Amit Shah
Advertisement

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी बिहारमधील लोकसभेच्या प्रचारसभेमध्ये, भारतीय जनता पक्ष बिहारमधील सीतामढीमध्ये सीता मातेचे भव्य मंदिर बांधणार असल्याचं जाहीर केलं. तसेच काँग्रेसने स्वताला नेहमीच प्रभु रामापासून स्वताला दुर ठेवलं आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय सितामातेच मंदिर कोणी बांधू शकणार नसल्याचा दावाही त्यांनी केला.

Advertisement

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बिहार दौऱ्यावर आहेत. बिहारमधील सितामढी येथे प्रचारसभेमध्य़े त्यांनी रामंदिरानंतर भाजप बिहारमधील सितामढी येथे सितामातेच मंदिर बांधणार असल्याचं जाहीर केलं. ते म्हणाले, 'आम्ही 'व्होट बँके'ला कधीच घाबरत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येत राम लल्लाचे मंदिर बांधलं आहे. आता सितामातेचं मंदिर उभारण्याचं काम बाकी असून सीतेमातेच्या जन्मस्थान असलेल्या सितामढी येथे हे मोठे स्मारक उभारण्याचे काम सुरु करणार आहोत. सीतेच्या जीवनासारखे आदर्श मंदिर फक्त नरेंद्र मोदीच बांधू शकतात."असे अमित शहांनी सांगताना काँग्रेसने स्वताला प्रभु रामापासून दुर ठेवल्याचाही आरोप केला. हिंदू लोककथेनुसार बिहारमधील सीतामढीजवळ राजा जनक शेत नांगरत असताना सीता माता सापडली होती.

Advertisement
Advertisement
Tags :

.