कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘तेजस’मधून अस्त्र क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

07:00 AM Mar 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हवेतून हवेत 100 किमीपर्यंत मारा करण्याची क्षमता

Advertisement

वृत्तसंस्था/चांदीपूर

Advertisement

भारतीय हवाई दलाने ओडिशातील चांदीपूर येथे हवेतून हवेत मारा करणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या अस्त्र क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. हे क्षेपणास्त्र एलसीए तेजस एमके-1 प्रोटोटाइपमधून प्रक्षेपित करण्यात आले. अस्त्र क्षेपणास्त्राचा समावेश भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात आधीच करण्यात आला आहे. मात्र, स्वदेशी लढाऊ विमानांमधून अस्त्र क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी पूर्ण करणे ही सुरक्षा दलाच्या दृष्टीने मोठी उपलब्धी मानली जात आहे. तेजस आणि अस्त्र क्षेपणास्त्राच्या एकात्मिकतेमुळे शत्रूच्या विमानांना दूरवरून लक्ष्य करता येते. या यशस्वी चाचणीमुळे शेजारील देश चीन आणि पाकिस्तान भीतीच्या छायेखाली आला आहे.

स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्र डीआरडीओने बनवले आहे. हे क्षेपणास्त्र 100 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील शत्रूच्या विमानांना पाडण्यास सक्षम आहे. हे पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळे भारत देश आता काही निवडक देशांपैकी एक बनला आहे. पूर्वी या तंत्रज्ञानावर अमेरिका, रशिया आणि फ्रान्स सारख्या देशांचे वर्चस्व होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या यशाबद्दल डीआरडीओ, आयएएफ, एनडीए आणि एचएएलच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने हे एक मोठे पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भारतीय हवाई दलाचे बळ वाढणार

यापूर्वी, सुखोई एसयू-30 एमकेआय सारख्या विमानांवर अस्त्र क्षेपणास्त्र तैनात करण्यात आले होते. परंतु आता झालेल्या या चाचणीने एलसीए तेजस सारख्या स्वदेशी लढाऊ विमानांशी देखील अस्त्र क्षेपणास्त्र पूर्णपणे जुळवून घेण्यास सक्षम असल्याचे सिद्ध केले आहे. नजिकच्या काळात भारतीय हवाई दल तेजस लढाऊ विमानमध्ये अस्त्र क्षेपणास्त्र तैनात करून आपली हवाई शक्ती आणखी मजबूत करेल.

संरक्षण रणनीतीला नवी ताकद

सध्या भारत आपल्या संरक्षण ताफ्याचे आधुनिकीकरण करण्यात व्यस्त आहे. अस्त्र क्षेपणास्त्राची मारक क्षमता आणि तेजसमधून त्याचे यशस्वी प्रक्षेपण भारताच्या संरक्षण क्षमतेला बळकटी देईल. सीमेवरील बदलत्या हवाई युद्ध रणनीतीच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचे ठरणार आहे. या चाचणीमुळे ‘एलसीए तेजस एमके-1ए’ प्रकाराच्या समावेशाची प्रक्रिया वेगवान होईल. तेजसचा हा प्रगत प्रकार हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे विकसित केला जात आहे. येत्या काही महिन्यांत अस्त्र क्षेपणास्त्राच्या आणखी चाचण्या केल्या जातील. या चाचण्यांमुळे त्याची अचूकता आणि विश्वासार्हता तपासली जाईल. भविष्यात अॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्टसारख्या लढाऊ विमानांमध्ये देखील याचा समावेश करण्याची योजना आहे. यामुळे भारताला हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालींमध्ये स्वावलंबी होण्यास मदत होईल. तसेच परदेशी शस्त्रांवरील अवलंबित्व कमी होणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article