रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण
डीआरडीओची यशस्वी कामगिरी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
स्वदेशी स्वरुपात विकसित लेझर-गाइडेड रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राचे (एटीजीएम) यशस्वी परीक्षण करण्यात आले आहे. डीआरडीओ आणि भारतीय सैन्याकडून केके रेंजमध्ये याचे परीक्षण गुरुवार पार पडले आहे. या परीक्षणादम्यान क्षेपणास्त्राने अचूकपणे प्रहार करत दोन विविध पल्ल्यांमधील लक्ष्यांचा यशस्वी भेद केला आहे. ऑल-इंडिजिनस लेझर गाइडेड एटीजीएम एक्सप्लोझिव्ह रिऍक्टिव्ह आर्मर (ईआरए) चिलखती वाहनांना नष्ट करण्यासाठी एक टेंडेम हाय एक्सप्लोझिव्ह अँटी-टँक वॉरहेडचा वापर करते.
एटीजीएमला मल्टी-प्लॅटफॉर्म लाँच क्षमतेसह विकसित करण्यात आले आहे. सद्यकाळात एमबीटी अर्जुनच्या 120 मिमी रायफल्ड गनद्वारे तांत्रिक मूल्यांकन परीक्षण सुरू आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लेझर गाइडेड एटीजीएमच्या यशस्वी परीक्षणासाठी डीआरडीओ आणि भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे.