महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

युद्धनौकाविरोधी क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण

06:06 AM Nov 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हेलिकॉप्टरमधून डागण्यात आले क्षेपणास्त्र

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारतीय नौदलाने देशाच्या पहिल्या स्वदेशी युद्धनौकाविरोधी क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले आहे. हे क्षेपणास्त्र सीकिंग-42 बी हेलिकॉप्टरमधून डागण्यात आले आहे. क्षेपणास्त्राने सर्व निकषांची पूर्तता करत लक्ष्याचा भेद केला आहे. यावेळी या क्षेपणास्त्रात स्वदेशी सीकर आणि गायडेंट टेक्नॉलॉजीची देखील पडताळणी करण्यात आली आहे.

या क्षेपणास्त्राचे परीक्षण मागील वर्षी ओडिशाच्या चांदीपूरच्या किनाऱ्यानजीक पार पडले होते. हे एक दीर्घ पल्ल्याचे युद्धनौकाविरोधी क्षेपणास्त्र (एलआरएएसएम) आहे. मागील वर्षी कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचे परीक्षण झाले होते. हे क्षेपणास्त्र 380 किलोग्रॅम वजनाचे होते आणि त्याचा मारक पल्ला 55 किलोमीटरचा होता.

नवे स्वदेशी दीर्घपल्ल्याचे युद्धनौकाविरोधी क्षेपणास्त्र सी-स्किमिंग ट्रॅजेक्ट्रीनुसार वाटचाल करत थेट लक्ष्यावर जाऊन आदळले आहे. सी-स्किमिंगचा अर्थ क्षेपणास्त्र समुद्राच्या पृष्ठभागाच्या काही फूट किंवा मीटरवरून जाते, ज्यामुळे ते रडारच्या कक्षेत येत नाही. हे तंत्रज्ञान भारताकडे ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्रात आहे. परीक्षणादरम्यान क्षेपणास्त्राची अचूकता, वेलिडेशन, नियंत्रण, गायडेन्स आणि मिशनसंबंधी अन्य अल्गोरिदमची पडताळणी करण्यात आली आहे.

हे क्षेपणास्त्र नौदलाच्या हेलिकॉप्टर्सवर तैनात केले जाणार आहे. या क्षेपणास्त्रात स्टेट-ऑफ-द-आर्ट नेव्हिगेशन सिस्टीम असून यात इंटीग्रेटेड एवियोनिक्स देखील आहे. या परीक्षणादरम्यान डीआरडीओचे वरिष्ठ वैज्ञानिक आणि भारतीय नौदलाचे अधिकारी उपस्थित होते. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीकोनातून हे क्षेपणास्त्र महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हणत नौदलाने या परीक्षणाचा व्हिडिओ जारी केला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article