For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आकाश क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी

06:36 AM Apr 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
आकाश क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी
Advertisement

जमिनीवरून हवाई हल्ले करण्यास सक्षम : अवघ्या काही क्षणात शत्रूंचा नाश शक्य

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय लष्कराच्या वेस्टर्न कमांडने रविवारी जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या ‘आकाश’च्या क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी केली. भारतीय संरक्षण दलांच्या नियमित कवायती अंतर्गत नियमित सराव म्हणून घेतलेली ही चाचणी देशाच्या संरक्षण क्षमतेसाठी मैलाचा दगड ठरली आहे. आत्मनिर्भर भारत मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) ही आकाश क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केली आहे. आकाश एसएएम प्रणाली हवेत एकाचवेळी अनेक लक्ष्यांना टार्गेट करू शकते.

Advertisement

‘आकाश’ हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेले जमिनीवरून हवेत मारा करणारे मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम (आयजीएमडीपी) अंतर्गत विकसित केले गेले आहे. त्याअंतर्गत नाग, अग्नी, त्रिशूल आणि पृथ्वी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे विकसित करण्यात आली आहेत. सध्या वायुसेना आणि लष्करासाठी दोन क्षेपणास्त्र आवृत्त्या तयार करण्यात आल्या आहेत.

स्वदेशी आकाश शस्त्र यंत्रणेला डीआरडीओने विकसित केले आहे. आकाश शस्त्रास्त्र यंत्रणा एक स्वदेशी सुरक्षा यंत्रणा असून याच्या खरेदीसाठी अनेक देशांनी उत्सुकता दाखविली आहे. डीआरडीओचे वैज्ञानिक सातत्याने या यंत्रणेत सुधारणा घडवून आणत आहेत.

आकाश भारत डायनेमिक्स लिमिटेडची (बीडीएल) एक कमी पल्ल्याचे जमिनीवरून आकाशात (एसएएम) मारा करणारी हवाई सुरक्षा यंत्रणा आहे. ही यंत्रणा शत्रूच्या हवाई हल्ल्यांपासून एका मोठ्या भूभागाचे रक्षण करू शकते. आकाश शस्त्रास्त्र यंत्रणा (एडब्ल्यूएस) ग्रूप मोड किंवा ऑटोनॉमस मोडमध्ये एकाचवेळी अनेक लक्ष्यांना भेदू शकते. यात बिल्ट-इन इलेक्ट्रॉनिक काउंटर-काउंटर मेजर्सची क्षमता सामील आहे.

आकाश क्षेपणास्त्र यंत्रणा 4-25 किलोमीटरच्या कक्षेत उ•ाण करणारे हेलिकॉप्टर, लढाऊ विमान आणि युएव्हीला प्रभावीपणे नष्ट करू शकते. लक्ष्याचा शोध घेण्यापासून ते पाडण्यापर्यंतची पूर्ण प्रक्रिया विद्युतवेगाने पूर्ण करते. याचबरोबर याची पूर्ण यंत्रणा ऑटोमेटिक आहे. ही अॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह जॅमिंगला प्रभावीपणे रोखण्यास सक्षम आहे. रेल्वे किंवा रस्तेमार्गाद्वारे ही यंत्रणा कुठेही नेता येते आणि जलदपणे ती तैनात देखील करता येते.

भारतीय हवाई दलाने आकाश क्षेपणास्त्रांची पहिली तुकडी मे 2015 मध्ये समाविष्ट केली. पहिले आकाश क्षेपणास्त्र मार्च 2012 मध्ये भारतीय हवाई दलाला सुपूर्द करण्यात आले होते, तर जुलै 2015 मध्ये ते औपचारिकपणे हवाई दलात समाविष्ट करण्यात आले होते.

आकाश क्षेपणास्त्रातील वैशिष्ट्यापूर्णता

आकाश क्षेपणास्त्र पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी यंत्रणा पूर्णपणे स्वायत्त मोडमध्ये कार्यरत असताना अनेक हवाई लक्ष्यांना गुंतवू शकते. या प्रणालीमध्ये एक लाँचर, एक क्षेपणास्त्र, एक नियंत्रण केंद्र, एक मल्टीफंक्शनल फायर कंट्रोल रडार, एक सिस्टम वेपन आणि डिटोनेशन मेपॅनिझम, एक डिजिटल ऑटोपायलट, सी4आय केंद्र (कमांड, कंट्रोल, कम्युनिकेशन्स आणि इंटेलिजेंस) आणि सहाय्यक पायाभूत उपकरणे असतात.

Advertisement
Tags :

.