महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जिल्हा रुग्णालयात झाली स्वादुपिंडातील स्यूडोसिस्टची यशस्वी शस्त्रक्रिया

12:43 PM Sep 28, 2024 IST | Abhijeet Khandekar
surgery of pancreatic pseudocyst
Advertisement

रत्नागिरी प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वादुपिंडातील स्यूडोसिस्ट असलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. ह्या शस्त्रक्रियेचे नाव सिस्टोगॅस्ट्रोस्टोमी असे आहे. ही शस्त्रक्रिया डॉ. मनोहर कदम (विभाग प्रमुख) आणि डॉ. सुश्रुत तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

Advertisement

या शस्त्रक्रियेसाठी सिव्हिल सर्जन डॉ. जगताप, डीन डॉ. जयप्रकाश रामानंद, मेडिसिनचे डॉ. विनोद सांगविकर यांचे मार्गदर्शन लाभले. ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. रुग्णाची प्रकृती आता स्थिर आहे.

Advertisement

रुग्णासह त्याच्या नातेवाईकांनी या यशस्वी उपचारासाठी समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी डॉक्टरांच्या कुशलतेचे आणि हॉस्पिटलच्या उत्कृष्ट सेवांचे कौतुक केले आहे. डॉ. कदम आणि डॉ. तेंडुलकर यांनी या प्रकारच्या आजाराचे लवकर निदान आणि वेळेवर उपचार करण्याचे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. अन्यथा धोकादायक ठरू शकते. आधुनिक तंत्रज्ञान आणि शस्त्रक्रियांच्या मदतीने रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

Advertisement
Tags :
district hospitalsurgery of pancreatic pseudocyst
Next Article