कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चित्तापूर येथे संघाचे यशस्वी पथसंचलन

10:52 AM Nov 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेंगळूर : महिनाभरापासून देशात चर्चेला कारणीभूत ठरलेले चित्तापूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पथसंचलन रविवारी यशस्वीरित्या पार पडले. शहरातील बजाज कल्याण मंडप येथून पथसंचलनाला सुरुवात झाली. आंबेडकर सर्कल, बसव हॉस्पिटल, एचडीएफसी बँक रोड, बसवेश्वर सर्कलमार्गे पुन्हा त्याचठिकाणी येऊन पथसंचलनाची सांगता झाली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पथसंचलनात केवळ 300 गणवेशधारी आणि 50 बँड वादकांना सहभागी होण्याची परवानगी होती.

Advertisement

संघाच्या 100 व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या या पथसंचलनात सहभागी झालेल्या गणवेशधारींवर महिलांसह मुले आणि नागरिकांनी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. दुपारी 3.45 वाजता सुरू झालेल्या पथसंचलनाची 4.22 वाजता सांगता झाली. सुमारे 47 मिनिटे पथसंचलन चालले. दरम्यान, 1.25 कि.मी. मार्गावर पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. कलबुर्गी एसपी अड्डूर श्रीनिवासलू यांच्या नेतृत्त्वाखाली पोलीस निरीक्षक, केएसआरपी डीएआर तुकडी आणि 250 होमगार्डसह 650 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article