For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वडगावच्या मंगाईदेवी यात्रेसाठी जय्यत तयारी

11:27 AM Jul 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
वडगावच्या मंगाईदेवी यात्रेसाठी जय्यत तयारी
Advertisement

मंगळवारी 30 रोजी यात्रेचा मुख्य दिवस

Advertisement

बेळगाव : शेतकऱ्यांची देवी म्हणून प्रसिद्ध असणारी वडगाव मंगाई देवीची यात्रा आठवडाभरावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे. यात्रेसाठी झोपाळे, पाळणे यासह इतर साहित्य दाखल झाले असून भर पावसात तयारी दिसून येत आहे. नागरिक यात्रेसाठी साहित्याची जुळवाजुळव करत आहेत. वडगावच्या मंगाई देवीची यात्रा मंगळवार दि. 30 रोजी होणार आहे. बेळगाव शहरातील सर्वात मोठी म्हणून ही यात्रा ओळखली जाते. मंगाई मंदिराचा परिसर विद्युत रोषणाईने सजविला जातो. हार, फुले, खेळणी, गृहोपयोगी साहित्य, अम्युजमेंट पार्क, खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले जातात. स्टॉलसाठी जागा मिळविण्यासाठी आतापासूनच विक्रेत्यांची धडपड सुरू झाली आहे. पारंपरिक पद्धतीने चव्हाण-पाटील घराण्याच्या नेतृत्वाखाली मंगाई देवीची यात्रा होते. महिन्याभरापूर्वी वडगाव परिसरात वार पाळले जात आहेत. मंगळवारी सकाळी 11 वा. गाऱ्हाणे घातल्यानंतर मुख्य यात्रेला सुरुवात होते. यावर्षीही पारंपरिक पद्धतीने यात्रा साजरी होणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.