महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काणकोणातील ‘लोकोत्सवा’ची जय्यत तयारी

01:05 PM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आमोणेतील आदर्श ग्रामचा परिसर सज्ज : बलराम शिक्षणसंस्था, आदर्श युवा संघाचे कार्यकर्ते तयारीच्या विविध कामांत मग्न

Advertisement

काणकोण : आदर्श युवा संघ, बलराम शिक्षणसंस्था आणि कला व संस्कृती संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने आमोणे येथील आदर्श ग्रामात आयोजित करण्यात आलेल्या 23 व्या लोकोत्सवाची जय्यत तयारी सध्या चालू आहे. 8 ते 10 डिसेंबर या दिवसांत आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाच्या तयारीत आदर्श युवा संघाच्या कार्यकर्त्यांनी स्वत:ला झोकून दिले आहे. लोकोत्सवाचे मुख्य प्रवेशद्वार, मुख्य मंडप, प्रदर्शनासाठी तयार करण्यात येणारे मंडप, खेळांची मैदाने, उपहारगृहे यांच्यासाठीच्या जागा तयार करण्याच्या कामात बलराम शिक्षणसंस्था आणि आदर्श युवा संघाचे कार्यकर्ते गुंतले आहेत. आदर्श युवा संघाचे संस्थापक तसेच आयोजन समितीचे अध्यक्ष असलेले सभापती रमेश तवडकर, सचिव अशोक गावकर, बलराम शिक्षणसंस्थेचे सचिव जानू तवडकर, आलोक मोडक आणि अन्य कार्यकर्ते एंकदर कामावर देखरेख ठेवून आहेत. या लोकोत्सवात भाग घेणाऱ्यांसाठी तसेच येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी खास वाहनतळ उभारण्यात आले आहेत. त्याचबरोबर विविध ठिकाणी खाद्यपदार्थांची सोय करण्यात करण्याच्या दृष्टीने तयारी चालली आहे. आमोणे येथील आदर्श ग्राम परिसर सध्या लोकोत्सवासाठी फुलून गेला आहे.

Advertisement

दुसऱ्या बाजूने, लोकोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याचीही जोरदार तयारी चालू असून खास ढोल पथकाच्या तालमी या ठिकाणी चालू आहेत. लोकोत्सवाच्या जागृतीसाठी गोव्यातील विविध भागांत बैठका चालू आहेत. यंदा महोत्सवात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या जवळजवळ 2 हजार मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. यंदाच्या लोकोत्सवाचा एक भाग शेजारच्या कर्नाटकातील जोयडा तालुक्यात तसेच सांगे-केपे या भागांत होणार असून यंदाच्या महोत्सवात विविध राज्यांतील सहा सभापती सहभागी होणार आहेत. त्यात आसामचे विश्वजित दायमारी, गुजरातचे शंकर चौधरी, हरयाणाचे जैन आनंद गुप्ता, महाराष्ट्राचे राहुल नार्वेकर, उत्तर प्रदेशचे सतीश महाना आणि उतराखंडमधील रितू खांडिरी यांचा समावेश राहणार आहे. उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि अन्य मंत्री उपस्थित राहणार आहेत.

8 रोजी उद्घाटनानंतर लोकोत्सवाच्या पहिल्या दिवशी तालुका पातळीवर समूह नृत्य, वेशभूषा, चित्रकला, कथाकथन, देशभक्तीपर गीतगायन, पोस्टर, मुकाभिनय, एकपात्री, एकेरी नृत्य, घुमट आरती आदी स्पर्धा होणार आहेत. 9 रोजी राज्यपातळीवर शालेयस्तरावरील देशभक्तीपर गीतगायन, पोस्टर, रांगोळी, एकेरी नृत्य, मुकाभिनय, समूह नृत्य, प्रश्नमंजूषा, वक्तृत्व, विज्ञान प्रकल्प आदी स्पर्धा होणार आहेत. 10 रोजी समारोपाच्या दिनी राज्यस्तरीय आणि खुल्या गटात रांगोळी, पथनाट्या, लघुपट, कविता सादरीकरण, मुखवटा रंगविणे, दांडिया नृत्य, एकेरी गायन, यासारख्या स्पर्धा होणार आहेत. त्याशिवाय महिला पथकांकडून लोकनृत्यांचे सादरीकरण होणार आहे. त्याचबरोबर विविध राज्यांतील लोकनृत्य पथके या महोत्सवात सहभागी होऊन आपल्या कलेचे प्रदर्शन घडविणार आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article