पहिल्या पोर्टेबल हॉस्पिटलचे यशस्वी पॅराड्रॉप
भारतीय हवाई दल-लष्कराने सी-130जे हरक्मयूलस वरून 15 हजार उंचीवरून खाली उतरवले
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय हवाई दल आणि लष्कराने शनिवार, 17 ऑगस्ट रोजी जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल यशस्वीपणे पॅराड्रॉप केले. भारतात बनवलेले पोर्टेबल हॉस्पिटल सी-130जे हरक्मयूलस विमानातून 15,000 फूट उंचीवरून खाली टाकण्यात आले. लष्कराच्या पॅरा ब्रिगेडने अचूक ड्रॉप उपकरण वापरून ते खाली आणले, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले. मात्र, हे पोर्टेबल ऊग्णालय कोठे पाडण्यात आले, याची माहिती मंत्रालयाने दिलेली नाही.
‘आरोग्य मैत्री हेल्थ क्मयूब’ असे पोर्टेबल हॉस्पिटलचे नाव आहे. हा प्रकल्प ‘भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग हित आणि मैत्री’ (भीष्म) अंतर्गत स्वदेशी पद्धतीने विकसित करण्यात आला आहे. अशाप्रकारचे क्मयूब हे जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल आहे. त्यात ट्रॉमा केअर सुविधा उपलब्ध आहेत. दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना ट्रॉमा केअर सेवा पुरवता यावी यासाठी क्मयूबची रचना करण्यात आली आहे. या पोर्टेबल हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण आणीबाणीच्या स्थितीत किंवा आपत्ती क्षेत्रांमध्ये वैद्यकीय सेवा पुरवू शकतो, असा दावा करण्यात आला आहे. सामान्यत: युद्ध किंवा आणीबाणीच्या काळात जखमी सैनिकांना उपचारासाठी एअरलिफ्ट करावे लागते, परंतु या आरोग्य मैत्री हेल्थ क्मयूबच्या मदतीने युद्धभूमीतच सैनिकांच्या उपचारासाठी सुविधा निर्माण करता येतात.
हे क्मयूब हॉस्पिटल नैसर्गिक आपत्ती, जत्रा, मोठे कार्यक्रम आणि दुर्गम डोंगराळ भागात वापरण्यासाठी डिझाइन केलेले आहे. क्मयूब हायटेक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. यावषी जानेवारीत अयोध्येत राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्यात त्याचा वापर करण्यात आला होता. आता भारतीय लष्कर आणि हवाई दलाने संयुक्त कामगिरीत महत्त्वपूर्ण मोहीम पूर्ण केली आहे. भारतीय सैन्याने आरोग्य मैत्री हेल्थ क्मयूबला सुमारे 15,000 फूट उंचीवर यशस्वीरित्या हवेतून सोडण्याचा पराक्रम केला आहे. भारतीय लष्कराच्या पॅरा ब्रिगेडने ट्रॉमा केअर क्मयूब्सच्या यशस्वी तैनातीमध्ये त्यांच्या प्रगत अचूक ड्रॉप उपकरणांचा वापर करून एअर ड्रॉपनंतर महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. वायुसेनेने क्मयूबला एअरलिफ्ट करण्यासाठी आणि अचूकपणे पॅरा-ड्रॉप करण्यासाठी आपल्या प्रगत रणनीतिक वाहतूक विमान सी-130जे सुपर हरक्मयूलसचा वापर केला.
आरोग्य मैत्री हेल्थ क्मयूबमधील साधने
आरोग्य मैत्री हेल्थ क्मयूब हे जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल आहे. केरळस्थित भारत सरकारची कंपनी एचएलएल लाइफ केअर, तिऊवनंतपुरम ही आरोग्य मैत्री क्मयूबच्या निर्मितीसाठी नोडल एजन्सी आहे. हे हेल्थ क्मयूब्स प्रोजेक्ट ‘भीष्म’ अंतर्गत तयार केले गेले आहेत. मॉड्यूलर ट्रॉमा व्यवस्थापन आणि समर्थन प्रणाली 72 मिनी-क्मयूब्सची बनलेली आहे. त्यात मिनी-आयसीयू, ऑपरेशन थिएटर, कुकिंग स्टेशन, अन्न, पाणी, वीज जनरेटर, रक्त तपासणी उपकरणे, एक्स-रे मशीन अशी वैद्यकीय उपकरणे समाविष्ट आहेत.
कोणत्याही क्षणी... कोठेही उपलब्ध!
हे पोर्टेबल हॉस्पिटल बंदुकीच्या गोळ्या, भाजणे, डोके, पाठीचा कणा आणि छातीच्या दुखापती, किरकोळ शस्त्रक्रिया, फ्रॅक्चर आणि मोठा रक्तस्त्राव यावर उपचार करू शकते. यामध्ये 200 हून अधिक ऊग्णांवर उपचार करता येणार आहेत. हे क्मयूब्स हलके आणि पोर्टेबल आहेत आणि ते एअरड्रॉप ते ग्राउंड ट्रान्सपोर्टेशनपर्यंत कुठेही वेगाने तैनात केले जाऊ शकतात. हे पोर्टेबल हॉस्पिटल अवघ्या आठ मिनिटांत तयार होऊन ऊग्णांवर उपचार सुरू करता येणार आहेत. ऊग्णालय तयार करण्यासाठी सुमारे दीड कोटी ऊपये खर्च येतो. हे पोर्टेबल हॉस्पिटल हवाई मार्गाने, जमिनीने किंवा समुद्राने कुठेही पाठवले जाऊ शकते.