For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोगटे कॉलेजच्या बीसीए विभागातर्फे‘इव्होजन’ महोत्सवाचे यशस्वी आयोजन

12:41 PM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोगटे कॉलेजच्या बीसीए विभागातर्फे‘इव्होजन’ महोत्सवाचे यशस्वी आयोजन
Advertisement

बेळगाव : केएलएस गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या बीसीए विभागाने राष्ट्रीय स्तरावरील ‘इव्होजन 13.0’ या तांत्रिक महोत्सवाचे यशस्वी आयोजन करून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. विविध कॉलेजमधील विद्यार्थ्यांना त्यांचे तांत्रिक कौशल्य, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सायबर सेक्युरिटी, आयटी तसेच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट यांना वाव मिळण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा सांगता सोहळा शनिवारी संस्थेच्या के. के. वेणुगोपाल सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाला उद्योजक निलेश चौगुले उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. केएलएस पीयू कॉलेजचे चेअरमन व्ही. एम. देशपांडे, प्राचार्य डॉ. वेणुगोपाल जालीहाळ यासह इतर मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी समन्वयिका डॉ. अस्मिता देशपांडे, प्रकाश देशपांडे, वैशाली शानभाग, रेवती श्रेष्ठी, गगन नाईक यासह इतर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.