For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अग्नी-4 चे यशस्वी प्रक्षेपण

06:55 AM Sep 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अग्नी 4 चे यशस्वी प्रक्षेपण
Advertisement

4000 किमी पर्यंतचे लक्ष्य भेदण्याची क्षमता

Advertisement

बालासोर / वृत्तसंस्था

भारताने शुक्रवार, 6 सप्टेंबर 2024 रोजी अग्नी-4 या मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले. ओडिशा येथील एपीजे अब्दुल कलाम तळावरून क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात आले. प्रक्षेपणाने सर्व बाबींची पूर्तता केली असून देशाच्या लष्करी क्षमतेत लक्षणीय वाढ झाल्याचे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले. ही एक नियमित प्रक्षेपण चाचणी होती. या चाचणीमुळे भारताच्या ‘विश्वसनीय किमान प्रतिबंध’ क्षमतेच्या धोरणाला बळकटी मिळाल्याचे सांगण्यात आले. हे क्षेपणास्त्र 4,000 किमी अंतरावरील लक्ष्य देखील नष्ट करू शकते.

Advertisement

अग्नी-4 हे भारताच्या स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडच्या अग्नी क्षेपणास्त्र मालिकेतील हे चौथे धोकादायक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे जगातील इतर क्षेपणास्त्रांपेक्षा हलके आहे. अग्नी-4 ची यापूर्वी 6 जून 2022 रोजी चाचणी घेण्यात आली होती. अग्नी-4 क्षेपणास्त्र डीआरडीओ आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे. त्याचे वजन 17 हजार किलोग्रॅम आहे. त्याची लांबी 66 फूट आहे. यामध्ये तीन प्रकारची शस्त्रे नेता येतात. त्यामध्ये पारंपरिक, थर्मोबॅरिक आणि सामरिक अण्वस्त्रांचा समावेश आहे.

अग्नी-4 ची सक्रिय श्रेणी 3,500 ते 4,000 किलोमीटर आहे. ते जास्तीत जास्त 900 किलोमीटर उंचीपर्यंत थेट उ•ाण करू शकते. लक्ष्य भेदण्याची त्याची अचूकता 100 मीटर आहे. म्हणजेच हल्ला करताना 100 मीटरच्या त्रिज्येत येणाऱ्या सर्व वस्तूंचा सहजपणे नाश करू शकते.

Advertisement
Tags :

.