महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नाबाद शतक झळकवणाऱ्या यशस्वी भारतीय कंपन्या

06:20 AM Nov 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उद्योग-व्यवसाय सुरु करणे, यशस्वी करणे व मुख्य म्हणजे तो सातत्याने सुरू ठेवणे हे काम सहज साध्य नाही. देश-विदेशात ही बाब लागू होते. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय उद्योग क्षेत्रात भारतीय कंपन्यांनी केवळ यश संपादनच  केले नाही तर आपल्या यशस्वी अव्वलतेसह जागतिक स्तरावर आपली छाप पाडली असून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन व अभ्यासांती ही बाब स्पष्ट झाली असून त्याचाच हा मागोवा.

Advertisement

अमेरिकेच्या होप कॉलेजमधील संशोधक-प्राध्यापक विकी हॅकेन यांनी जागतिक स्तरावर आपली व्यवसाय शंभरी पूर्ण केलेल्या कंपन्यांच्या व्यवसाय आणि व्यवस्थापन शैलीचा विशेष अभ्यास केला आहे. त्यांनी विशेषत्वाने नमूद केलेली बाब म्हणजे 100 वर्षांनंतरही यशस्वीपणे व प्रगतीशीलपणे काम करणाऱ्या या कंपन्या म्हणजे जागतिक स्तरावर ‘व्यावसायिक डायनॉसॉर’ आहेत. त्यांच्या स्थापनेपासूनचा इतिहास नेहमीच सर्वांसाठी कुतूहल व संशोधनाचा विषय राहिला आहे.

Advertisement

या आणि अशा प्रकारच्या कंपनी-व्यवसायाच्या शतक पूर्ण केलेल्या कंपन्यांच्या अभ्यासात टाटा उद्योग समूहाचे नाव अग्रक्रमाने येते. टाटा उद्योगातील टाटा पॉवर, टाटा कॉफी व इंडियन हॉटेल्स कंपनी या कंपन्यांचा यासंदर्भात विशेष उल्लेख करावा लागेल. याशिवाय जे. आर. डी. टाटा यांनी 1919 मध्ये न्यू इंडिया अॅश्युरन्स या खासगी कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीचे पुढे 1963 मध्ये राष्ट्रीयीकरण करण्यात आले. हा इतिहास आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबादचे निवृत्त प्राध्यापक द्विजेंद्र त्रिपाठी यांनी केलेल्या अभ्यासानुसार कुणाही उद्योग-व्यवसायाला यशस्वीपणे व दीर्घकाळ चालविण्यासाठी स्थिती-परिस्थितीनुरुप बदलाची वेळेत व दीर्घकालीन स्वरुपात अंमलबजावणी करणे अनिवार्य ठरते. भारतीय कंपन्यांच्या संदर्भात ही बाब प्रामुख्याने व प्रकर्षाने दिसून येते.

हीच बाब चेन्नईच्या वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेसचे प्रो. एल. बी. के. कृष्णन यांच्या अभ्यासाने याच मुद्याला दुजोरा मिळतो. त्यांनी अभ्यासांती नमूद केल्यानुसार उद्योग-व्यवसायाने बदलत्या परिस्थितीनुरुप उद्योग-उत्पादनामध्ये संशोधनासह बदल घडवून आणणे आवश्यक असते. यासंदर्भात ते प्रामुख्याने देशांतर्गत स्टील उद्योगाचा प्रामुख्याने उल्लेख करतात. स्टील उद्योगात दर 5 वर्षांनी मोठे बदल होतात. या बदलामध्ये आर्थिक, तंत्रज्ञान, उत्पादन, कार्यपद्धती, व्यापारी स्पर्धा, उत्पादनाचा दर्जा व उपयोग इ.चा समावेश असतो. हे प्रमुख, महत्त्वाचे व अपरिहार्य असणारे बदल टाटा स्टीलने सातत्याने पाळले, परिस्थितीवर मात करून त्यावर तोडगा काढतानाच दीर्घकालीन नियोजन व उपाययोजना केली हेच टाटा स्टीलच्या शतकी व्यावसायिक यशाचे रहस्य याच अभ्यासातून दिसून आले.

उद्योग-व्यवसायाच्या संदर्भात विशेषत: भारतीय उद्योजक-कंपन्यांपुढे असणारे महत्त्वाचे आव्हान म्हणजे राजकारण, राजकारणी व तथाकथित नोकरशाहीशी पडणारी कायमस्वरुपी गाठ. स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रचलित असणाऱ्या या स्थितीत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर व त्यानंतरच्या काळात फारसा फरक पडला नाही.

2019 मध्ये केंद्रिय वित्त सचिव पदावरून निवृत्त झालेल्या सुभाषचंद्र गर्ग यांनी नमूद केल्यानुसार सरकार आणि सरकार दरबारी असणाऱ्या विविध उपाय आयुधांमुळे सरकार आणि व्यावसायिक या उभयतांना एकमेकांशी वेळोवेळी व आवश्यक स्वरुपात संबंध ठेवावेच लागतात. ही एक व्यावहारिक अपरिहार्यता ठरते. याशिवाय सरकारच्या अर्थसंकल्प, औद्योगिक धोरण, रिझर्व्ह बँकेची ध्येय-धोरणे, कर-पद्धती, उद्योगांसाठी आवश्यक सोयी, मुलभूत सुविधा, वाहतूक, वीज, जागा इ. सरकारद्वारा दिल्या जातात. उद्योगासाठी सुरुवातीपासून नेहमीसाठी आवश्यक या बाबींचा सहारा उद्योग व उद्योगपतींना घ्यावा लागतो. त्याचवेळी कर-राजस्वापासून विकासापर्यंतच्या सर्व बाबी शासन-सरकार उद्योग-व्यवसाय यांच्याद्वारेच साध्य करू शकतात. शतकाहून अधिक काळ आपला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या संदर्भात ही बाब आजही लागू होते. स्वातंत्र्यपूर्व, स्वातंत्र्योत्तर, प्रगतीशील धोरणे, जागतिक उलाढाली, विविध आव्हाने, खुली अर्थव्यवस्था, बहुराष्ट्रीय कंपन्या, उद्योजकतेचे बदलते स्वरुप यानंतर पण या स्थितीत फारसा बदल झाला नाही.

उद्योग-व्यवसायाशी संबंधित व शासन-प्रशासनाशी निगडित अशा वर नमूद केलेल्या मुख्य मुद्यांशिवाय उद्योग-व्यवसायाशी संबंधीत व निगडित असणारे अन्य महत्त्वाचे मुद्दे म्हणजे व्यवसाय-व्यवस्थापन पद्धती व आर्थिक आणि विक्री व्यवस्था, या संदर्भात भारतीय कंपन्यांनी विविध संदर्भात ज्या प्रकारे भूमिका घेऊन एकीकडे सरकार आणि सत्तारुढ पक्षाशी व तत्कालीन प्रशासन पद्धतीशी जुळवून घेतांनाच आपला व्यवसाय सांभाळून त्यामध्ये वाढ केली ती बाब तपासून पाहण्यासारखी आहे.

यासंदर्भात आयटीसी उद्योग समूहाचे उदाहरण अभ्यासण्यासारखे ठरते. व्यवसायवाढीच्या ताज्या व नव्या संदर्भाच्या संदर्भात विशेषत्वाने सांगायचे म्हणजे 1975 मध्ये छपाई उद्योगात झेप घेतलेल्या आयटीसीने त्याच दरम्यान आदरातिथ्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पदार्पण केले. त्यानंतर आयटीसी समूहाने कृषी-उद्योग क्षेत्रात 1990 मध्ये व त्यातूनच पुढे 2000 मध्ये माहिती तंत्रज्ञान व पुढल्याच वर्षी म्हणजेच 2001 मध्ये अन्न प्रक्रिया उद्योगात पदार्पण करणाऱ्या कंपनीचा प्रगतीपर प्रवास अनेक संदर्भात महत्त्वाचा आहे.  मुख्य म्हणजे कंपनीचा हा विकास प्रवास वेगळे उत्पादन, व्यवसाय क्षेत्र, वेगळे भौगोलिक क्षेत्र या विविध प्रकारे वेगळ्या संदर्भात वेगळा ठरला हे विशेष. मुख्य म्हणजे त्या दरम्यान कंपनीचा व्यवसाय विकास होत असताना वरील कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे शासन अस्तित्वात होते हे विशेषत्वाने उल्लेखनीय आहे.

दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे निवृत्त प्राध्यापक अरुणकुमार यांच्यानुसार केंद्र वा राज्य  सरकारांनी आर्थिक-उद्योग वा व्यावसायिक क्षेत्रासाठी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी प्रक्रियेत वेळेत व व्यावहारिकपणे सहभागी होणाऱ्या कंपन्या यशस्वी होतात. त्यांच्या मते अशा कंपन्याच यशस्वी-सक्रिय ठरतात. अशा कंपन्यांच्या व्यवस्थापन स्तरावर प्रभावी नेतृत्व, निर्णयांना लवचिकतेची साथ, आर्थिक क्षमतेला व्यवसायवाढीची साथ अपरिहार्य असते. या निमित्ताने आपले व्यवसाय शतक पूर्ण  करणाऱ्या कंपन्यांची परंपरा पडताळून पाहता असे स्पष्ट होते की, या कंपन्यांनी बदलत्या शासन-प्रशासनापासून, तंत्रज्ञान, व्यवसाय-व्यवस्थापन पद्धती, सामाजिक स्थिती, कालमान, उत्पादनक्षमता इ. मध्ये वेळेनुसार व वेळेत बदल घडवून आणले. यामध्ये शासन-प्रशासन पद्धती, त्यांची  कार्यपद्धती, आर्थिक- व्यावसायिक ध्येय-धोरणे व मुख्य म्हणजे केवळ उत्पादकता व उत्पादनच नव्हे तर त्यांचा दर्जा सर्वाधिक महत्त्वाचा ठरला आहे.

                    दत्तात्रय आंबुलकर

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article