हिंडलग्याच्या दोन धावपटूंचे सुयश
10:08 AM Nov 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
सुरेश सांगावकर सुवर्ण, चंद्रकांत कडोलकरना रौप्य
Advertisement
वार्ताहर/हिंडलगा
बेळगाव येथे रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम यांच्यावतीने रविवार दि. 16 रोजी बेळगावचा सर्वांगीण विकास व आरोग्य विषयक जनजागृतीसाठी रोटरी हाफ मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. ही स्पर्धा विविध वयोगटात तसेच विविध पल्ल्यांमध्ये घेण्यात आली. या स्पर्धेत येथील धावपटू सुरेश सांगावकर यांनी 60 ते 99 या वयोगटातील 10 कि.मी. धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले तर 55 वर्षावरील गटात निवृत्त सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन चंद्रकांत कडोलकर यांनी रौप्य पदक घेतले. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. वयस्कर गटात सुरेश सांगावकर यांनी राष्ट्रीय स्पर्धेतही यापूर्वी यश मिळविले आहे.
Advertisement
Advertisement