यक्षित युवा फौंडेशनचे तायक्वांदो खेळाडूंचे यश
बेळगाव : बेंगळूरातील येलहंका येथे झालेल्या कर्नाटक ऑलिम्पिक असोसिएशन, स्पोर्ट्स अॅथॉरिटी ऑफ कर्नाटक अॅण्ड इंडिया तायक्वांदोशी संलग्न असलेल्या कर्नाटक तायक्वांदोच्या संयुक्त विद्यमाने आरडब्ल्यूएफ तायक्वांदो अकादमीने दुसऱ्या तायक्वांदो स्पर्धेत यक्षित युवा फौंडेशनच्या राव युवा अकादमीच्या तायक्वांदो खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. सदर स्पर्धेत 8 वर्षांखालील मुलांच्या गटात इशान पाटीलने सुवर्ण, 8 वर्षांखालील मुलींच्या गटात सान्वी वागुकरने सुवर्ण, स्तुती तुमरी, अनिका मुनवळ्ळी यांनी रौप्य, श्राव्या भातकांडेने कांस्य पदक पटकावले. सब ज्युनियर मुलांच्या गटात वेदांत खडबडी व मोहम्मद चांदशाह यांनी सुवर्ण, दीप पाटीलने रौप्य, आणि पवनराज दड्डीकर, साईदीप पाटील, हर्ष वैष्णव, गगन शिवपूजीमठ यांनी कांस्यपदक पटकावले. सब ज्युनियर मुलींच्या गटात सोयरा घाडी यांनी रौप्य, सान्वी पाटील, कनिशा जैन आणि स्पूर्ती ताळुकर यांनी कांस्य पदक पटकावले. कॅडेट मुलांच्या गटात मोहम्मदशफी चांदशाह यांनी रौप्य, आरुष हंजे, आरुष टूमरी आणि रुग्वेद पाटील यांनी कांस्यपदक पटकावले. कॅडेट मुलींच्या गटात सान्वी वासोजीने रौप्य आणि निशिका पात्राने कांस्य पटकाविले. ज्युनियर मुलांच्या गटात स्पर्श भोसलेने रौप्य पदक जिंकले. या खेळाडूंना भारतीय वायुसेनेच्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक व यक्षित युवा फाउंडेशनचे अध्यक्ष तायक्वांडो मास्टर श्रीपाद आर. राव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.