महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पॅरा जलतरण स्पर्धेत स्वीमर्स-अॅक्वेरेसचे यश

10:53 AM Oct 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

54 सुवर्ण, 20 रौप्य, 3 कांस्य पदकांची कमाई

Advertisement

बेळगाव : बेंगळूर येथे कर्नाटक राज्य पॅरा जलतरण संघटनेच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय पॅरा जलतरण स्पर्धेत स्वीमर्स व अॅक्वेरेस क्लबच्या जलतरणपटूंनी 54 सुवर्ण, 20 रौप्य  व 3 कास्य पदकासह एकूण 77 पदकांची कमाई करीत घवघवीत यश संपादन केले आहे. बेंगळूर येथील बसवनगुडी जलतरण तलावात घेण्यात आलेल्या पॅरा राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्वीमर्स व अॅक्वेरेस क्लबच्या जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये श्रीकांत देसाई, सिमर गौंडाडकर, अकिंत पिळणकर, स्वस्तीक पाटील, राघवेंद्र अणवेकर, शरण्या कुंभार, प्रज्वल नेर्लेकर, साहील जाधव, पृथ्वी नेर्लेकर, चिन्मय खेमन्नावा, प्रज्वल हनुमत्ती, अमोघ तंगाडी, सोनम पाटील, रमया लमाणी यांनी प्रत्येकी 3 सुवर्णपदके पटकाविली.

Advertisement

अमोल कुंभारने 2 सुवर्ण, 1 रौप्य, योगेश पाटीलने 2 सुवर्ण, 1 रौप्य, संस्कृती यलामट्टीने 2 सुवर्ण, 1 रौप्य, सीया पाटीलने 2 सुवर्ण, बसू माळी 2 सुवर्ण, समित मुतगेकरने 1 सुवर्ण, 2 रौप्य, साक्षी पाटीलने 1 सुवर्ण, 2 रौप्य, सौम्या बांदिवडेकरने 3 रौप्य, प्रवीण मुलीमनीने 3 सुवर्ण, सौंदर्या दंडन्नावरने 3 रौप्य, प्रवीण दोड्डण्णावरने 2 रौप्य, कविता मांडीवल्लरने 2 रौप्य तर मारुती कोप्पदने 3 कास्य पदके पटकाविली. विजेत्या सर्व जलतरणपटूंना जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतीकर, इम्रान उचगावकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. पदक विजेत्यांचे अभिनंदन होत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article