For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

क्रीडा स्पर्धेत रणकुंडये स्कूलचे यश

10:48 AM Aug 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
क्रीडा स्पर्धेत रणकुंडये स्कूलचे यश
Advertisement

वार्ताहर/किणये 

Advertisement

सार्वजनिक शिक्षण खाते किणये विभागीय स्पर्धेत महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हायस्कूल रणकुंडयेच्या खेळाडूंनी यश मिळविले. सदर स्पर्धेत अंजली पाटीलने 800 मी. प्रथम, लांब उडीत प्रथम व 100 मी. मध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. गायत्री राजगोळकर भालाफेकमध्ये प्रथम, 1500 मी. प्रथम, 3000 मी. चालणे द्वितीय, वैशाली पाटील बुद्धिबळमध्ये विजेतेपद, व तिहेरी उडीत द्वितीय, आदिती पाटील 3000 मी. धावणे प्रथम, 3000 मी. तृतीय, अस्मिता पाटील 200 मी. प्रथम, थालीफेकमध्ये तृतीय, सृष्टी निलजकर 400 मी. द्वितीय व लांब उडीत तृतीय तर कल्पना कांबळे गोळा फेकमध्ये तृतीय, आनंदी निलजकर 3000 मी. धावणे तृतीय क्रमांक मिळविला. मुलींच्या रिले संघाने विजेतेपद पटकाविले. मुलांच्या विभागात नेहाल तहसीलदार गोळा फेक व भाला फेक प्रथम, साईश पावशे उंच उडी प्रथम व थाळीफेक द्वितीय, सुमित पाटील तिहेरी उडी प्रथम, लांब उडी तृतीय, रमजान तहसीलदार 5000 मी. चालणे प्रथम, समर्थ निलजकर 800 मी. तृतीय क्रमांक मिळवला. सांघिक खेळामध्ये व्हॉलीबॉलचे जेतेपद मुलांच्या संघाने पटकाविले. यांना मुख्याध्यापिका आर. एल. पाटील, के. ए. डुकरे, क्रीडाशिक्षक पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Advertisement
Advertisement
Tags :

.