महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नंदगड पदवीपूर्व महाविद्यालयाचे यश

10:25 AM Sep 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर/हलशी

Advertisement

पदवीपूर्व शिक्षण खाते बेळगाव आणि सीआरएस पदवीपूर्व महाविद्यालय इटगी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय पदवी पूर्व महाविद्यालयाच्या क्रीडा स्पर्धा सीआरएस पदवीपूर्व महाविद्यालय इटगी यांच्या मैदानावर नुकताच पार पडल्या. या क्रीडास्पर्धेत दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचलित डीएमएस पदवीपूर्व महाविद्यालय नंदगड यांनी सहभाग घेऊन सांघिक तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये यश संपादन केले आहे.मुलांच्या कबड्डीमध्ये प्रथम क्रमांक, मुलींच्या कबड्डी मध्ये द्वितीय क्रमांक, मुलांच्या हॉलीबॉल मध्ये द्वितीय क्रमांक संपादित केले आहेत.

Advertisement

तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये काजल बेलवटकर हिने 3000 मी. धावणे प्रथम क्रमांक, हर्डल्समध्ये द्वितीय क्रमांक, वैभवी इशरान हिने थाळीफेकमध्ये प्रथम क्रमांक, भाला फेकमध्ये द्वितीय क्रमांक, मुक्ता खानापूरकर हिने थाळी फेकमध्ये द्वितीय क्रमांक, अनन्य धबाले हिने 3000 मी. चालणे प्रथम क्रमांक, संगीता भुजगुरव हिने दोरी उडी प्रथम क्रमांक, सूरज पाटील यांने 400 मी. द्वितीय क्रमांक, हर्डल्समध्ये तृतीय क्रमांक मिळविला आहे.या सर्व विद्यार्थ्यांना कॉलेजच्या प्राचार्या दीपा हन्नूरकर, टीम मॅनेजर प्रा. आय. पी. गावडे, प्रा. एम. आर. मिराशी, प्रा. एन. टी. पाटील, प्रा. एकनाथ पाटील, प्रा. राणी मडवळकर या सर्वांचे मार्गदर्शन मिळत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article