For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माहेश्वरीच्या जलतरणपटूंचे यश

06:06 AM Nov 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
माहेश्वरीच्या जलतरणपटूंचे यश
Advertisement

  बेळगाव :

Advertisement

हैदराबाद येथे झालेल्या 25 व्या राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेने घवघवीत यश मिळविले आहे. या स्पर्धेत माहेश्वरीच्या जलतरणपटूंनी 12 सुवर्णपदक, 6 रौप्य आणि 2 कांस्य अशी एकूण 20 पदकांची कमाई केली. या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.

प्रज्वल हणमनेट्टीने 3 सुवर्ण, सोनम पाटीलने 3 सुवर्ण, साक्षी पाटीलने 3 सुवर्ण, आकाश हंजीने 2 सुवर्ण आणि अमोघ तंगडीने 1 सुवर्ण, 1 रौप्य व 1 कांस्यपदक मिळविले. चिन्मय क्यामण्णावरने 3 रौप्य, रम्या लमाणीने 2 रौप्य, सुकृत यळहट्टीने 1 कांस्यपदक मिळविले. त्याच बरोबर सौंदर्या दंडीणवर, कविता मडिवाळर, मंदार कट्टीमणी यांनीही सहभाग घेतला होता. या सर्व विद्यार्थ्यांना उमेश कलघटगी व सुरेश मादीगर यांचे मार्गदर्शन मिळाले. संस्थेचे अध्यक्ष चिंतामणी ग्रामोपाध्ये, श्रीनिवास शिवणगी, मुख्याध्यापिका अनिता गावडे यांनी कौतुक केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.