For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापूर मराठा मंडळ हायस्कूलचे यश

10:45 AM Sep 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
खानापूर मराठा मंडळ हायस्कूलचे यश
Advertisement

खानापूर : मराठा मंडळ खानापूर हायस्कूलच्या खेळाडूनी शैक्षणिक क्रीडास्पर्धेमध्ये खानापूर विभागातून यश संपादन केले. तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये 14 ते 17 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या थ्रो बॉलमध्ये त्यानी प्रथम, क्रिकेटमध्ये 17 वयोगटातून प्रथम, हॉकीमध्ये खेळामध्ये या हायस्कूलमधील तनुजा  गुरव, सानिका पाटील, श्रेया पाटील, अनुराधा मयेकर, भक्ती गावडा या पाच विद्यार्थिनींची जिल्हा पातळीवर निवड झाली आहे. धावणे या क्रीडाप्रकारात वेदांत होसूरकरने 800 मी, 1500 मी. व 3000 मी सर्वसाधारण विजेतेपद मिळविले आहे.कुस्तीमध्ये भक्ती गावडा, तनुजा गुरव, राधिका चाळगोंडे,विविध वजन गटात प्रथम क्रमाक मिळवून यांची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली आहे.

Advertisement

शटल बॅडमिंटनमध्ये पार्थ पाटील, श्रेयश कोडचवाडकर, श्रावणी कदम, संस्कृती गावडा, ज्ञानेश्वरी कुसाळे प्रथम तर बुद्धीबळमध्ये शंकर खैरवाडकर, मंथन लाड,सतिश सावंत, श्रावणी कदम प्रथम,योगामध्ये श्रेयश कोडचवाडकर, समर्थ बासटेकर, श्रेया पाटील, पल्लवी पाटीलने तर 80 मी अडथळा स्पर्धेत हरिश कुगजी व 400 मी अडथळा शर्यतीत अशिष हलगेकरला प्रथम, 200 मी व 400 मी धावण्याच्या स्पर्धेमध्ये नागेश चौगुलेने द्वितीय क्रमांक पटकाविला तर या यशस्वी सर्व खेळाडूंची जिल्हा पातळीवर निवड करण्यात आली आहे.त्यांना शारीरिक शिक्षक सी. के. गोमाण्णाचे यांचे मार्गदर्शन तर संस्थेचे अध्यक्षा राजश्री हलगेकर, मुख्याध्यापक के. व्ही. कुलकर्णी, यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.