कल्याणी अंबोळकरचे यश
09:44 AM Sep 13, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते बेळगाव तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत कुस्तीपटू कल्याणी अंबोळकरने 69 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावित यश संपादन करून जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. स्पोर्टस् हॉस्टेलच्या कुस्तीच्या सभागृहात घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत कल्याणी अंबोळकरने भाग घेत 69 किलो गटात अंतिम फेरीत धडक मारीत यश संपादन करीत विजेतेपद मिळविले. कल्यानी ही हेरवाडकर हायस्कूलची विद्यार्थीनी आहे. ती बालिका आदर्श कुस्ती संकलनात सराव करते तिला राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक मारूती घाडी, उमेश बेळगुंदकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तर शाळेचे मुख्याध्यापिका शोभा कुलकर्णी क्रिडा शिक्षक कल्लप्पा हागीदळे व वडील सोमनाथ अंबोळकर यांचे प्रोत्साहन लाभत आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article