जिजामाताच्या खेळाडूंचे सुयश
क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
मराठा मंडळ जिजामाता हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी कुस्ती स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या स्पर्धेत सानिका हिरोजीने 57 किलो गटात सुवर्णपदक पटकाविले. तसेच शालेय पातळीवर घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक घेतला होता त्यामुळे तिची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. श्रावणी तरळेने 62 किला वजन गटात तृतीय क्रमांक मिळविला आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक मिळविला होता. तिची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच आरती मुरकुटे या विद्यार्थिनीने जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला असून तिची राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थिनींना मराठा मंडळाच्या अध्यक्षा राजश्री नागराजू यांचे प्रोत्साहन तर जिजामाता हायस्कूलचे मुख्याध्यापक एन. डी. पाटील व क्रीडा शिक्षिका अश्विनी पेटकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.