ज्ञान प्रबोधन विद्यालयाचे क्रेडेन्झ आंतरशालेय महोत्सवात यश
बेळगाव : ज्ञान प्रबोधन मंदिर विद्यालयाच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाने केएलएस इंग्रजी माध्यम विद्यालयाने आयोजित केलेल्या क्रेडेन्झ या आंतरशालेय महोत्सवात सर्वसाधारण अजिंक्यपद पटकाविले. या महोत्सवात शाळेच्या माध्यमिक विभागाने सलग तिसऱ्यांदा अजिंक्यपद मिळविले आहे. प्राथमिक विभागात पथनाट्या स्पर्धेत त्रिशा कलशेट्टी, अनुषा डुकरे, ऋषभ लोकरी, अर्जुन प्रभू, तनिष्का कल्लेहोळकर, सृष्टी कुलकर्णी, तारिका नांदणीकर, संचित पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. समूहनृत्य स्पर्धेत हर्षिता कित्तूर, स्वराज धामणेकर, अनिका बर्डे, नैतिक सुळगेकर, यश भैरण्णावर, मृणाल पाटील, प्राची धामणेकर, स्वस्तिक कमल या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला.
माध्यमिक विभागात अंशुमन दागा याने मास्टर क्रेडेन्झ हा बहुमान पटकाविला. आदिनारायण प्रभूखोत व अथर्व पवार यांनी वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. धन्या पाटील, जान्हवी गिंडे, अवनी जिगाडे, ओमकार लोहार, मन्यु कुलकर्णी, विक्रम वाटवे या विद्यार्थ्यांनी समूहगीत गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या शिक्षिका रिबेका सेरॅफिम, सिद्धाली पाटील, चंद्रज्योती देसाई यांचे मार्गदर्शन मिळाले. शाळेचे प्रशासक डॉ. गोविंद वेलिंग, प्राचार्या मंजिरी रानडे, महादेव गुरव यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.