बेळगावच्या स्केटर्सचे सुयश
बेळगाव : बेंगळूर येथे 41 व्या राज्यस्तरीय स्पीड स्केटिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूनी चमकदार कामगिरी करताना 6 सुवर्ण, 6 रौप्य व 8 कांस्य अशी एकूण 20 पदकांची कमाई केली. बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो.चे निवड झालेले स्केटर्स 41 व्या राज्यस्तरीय स्पीड स्केटिंग स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये सुमारे 600 स्पर्धक सहभागी झाले होते. सदर स्पर्धेतील पदक विजेते स्केटर्स पुढील प्रमाणे-सई पाटील 2 सुवर्ण, तीर्थ पाच्छापूर 2 सुवर्ण, प्रांजल पाटील 1 सुवर्ण, 1 रौप्य, 1 कांस्य, आर्या कदम 2 रौप्य, 1 कांस्य, सत्यम पाटील 1 सुवर्ण, सौरभ साळोखे 1 रौप्य, 2 कांस्य, अनघा जोशी 1 रौप्य, 1 कांस्य जान्हवी तेंडूलकर 1 रौप्य, 1 कांस्य, अथर्व पी. 1 कांस्य, स्वयंम पाटील 1 कांस्य पदक. या स्केटींगपटूंना प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विठ्ठल गंगणे, योगेश कुलकर्णी, विश्वनाथ येळ्ळूरकर, सोहम हिंडलगेकर यांचे मार्गदर्शन तर डॉ. प्रभाकर कोरे, शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर, इंदुधर सीताराम यांचे प्रोत्साहन मिळत आहे.