बेळगाव जिल्हा तायक्वांदो संघाचे यश
बेळगाव : कर्नाटक सरकार शिक्षण खाते आयोजित राज्यस्तरीय 14 व 17 वर्षाखालील वयोगटाच्या मुला-मुलींचा तायक्वांदो स्पर्धेत बेळगाव जिल्हा संघाने यश संपादन केले. चिक्कमंगळूर येथे झालेल्या या स्पर्धेत तनिष राव सेंटपॉल व निशित निंगनूर, आयुष साळुंखे-सेंट जॉन्स काकती, मोहम्मद साद इंचणालकर-कन्नडा कॉन्व्हेंट काकती, अभिनव पाटील-आर्मी पब्लिक बेळगाव, मोहम्मदशफी चांदशा-बेन्सन्स यमनापूर, आऊष टुमरी-लिटल स्कॉलर्स बेळगाव, श्रेया पाखरे व समीक्षा बेळवी- सेंट मेरीज, अथर्व गावडे-सेंट झेवियर स्कूल, अथर्व मुरबाळे-मराठा मंडळ, समर्थ दड्डीकर, दीपक अथणी, शांभवी, अर्मिन अनवर-विजया स्कूल व सृष्टी कल्लोळी-महिला विद्यालय बेळगाव यांनी सुवर्णपदक पटकाविले.
तर मोहम्मदशफी चांदशहने 14 वर्षे खालील व 37 किलो वजनीगटात रौप्य, आयुष साळुंखेने 29 किलो वजनी गटात कास्य, 17 वर्षे खालील वयोगटात अथर्व मुरबाळ 78 किलो वजनीगटात कास्य, उर्मीने 44 किलो वजनीगटात कास्यं मिळविले. जिल्हा संघाचे व्यवस्थापक म्हणून सरकारी प्राथमिक शाळा मच्छे सुभाष गंभीर व संगोळी रायण्णा फर्स्ट ग्रेड कॉलेज येथील त्रिवेणी भडकवाड, संजय घोडावतचे स्वप्निल पाटील व बेळगाव जिल्हा तायक्वांदो संस्थेतील वैभव राजेश पाटील यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. सर्व खेळाडूंना शिक्षण खात्याचे जिल्हा शारीरिक शिक्षण अधिकारी जुनेद पटेल यांचे प्रोत्साहन तसेच भारतीय वायुसेनेचे आंतरराष्ट्रीय तायक्वांडो प्रशिक्षक व पंच तायक्वांडो मास्टर श्रीपाद आर राव यांचे मार्गदर्शन लाभला.