For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्हाळशी डिचोली तळ्यातील मगरीला पकडण्यात यश

12:42 PM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
व्हाळशी डिचोली तळ्यातील मगरीला पकडण्यात यश
Advertisement

तलावात आणखी दोन मगरी असल्याचा स्थानिकांचा दावा  

Advertisement

डिचोली : व्हाळशी डिचोली येथील श्री देव तळेश्वर मंदिराच्या बाजूलाच असलेल्या तळ्यातील  लावलेल्या पिंजऱ्यात काल शुक्रवार दि. 21 जून रोजी सकाळी मगर अडकली. वन खात्याला या तळ्यातील मगरीला पकडण्यात यश आले, पण या तलावात आणखी दोन मगरी असल्याचा दावा स्थानिक लोकांनी केला असून याही मगरींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.

व्हाळशीतील तलावात पाणी पिण्यासाठी आलेल्या एका कुत्र्याला झडप घालून मगरीने पळविले होते. त्यापूर्वी एका अजगराचा फडशा पाडल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे या भागात मगरींची दहशत वाढत असल्याचे दिसून येत होते. सदर मगरींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली होती.

Advertisement

त्यानुसार स्थानिक नगरसेवक विजयकुमार नाटेकर यांनी वन खात्याला कळविले होते. वन खात्याने याची दखल घेऊन तळ्यात पिंजरा लावला होता. शुक्रवारी सकाळीच या पिंजऱ्यात मगर अडकल्याचे काहींनी पाहिले व याची माहिती वन खात्याला दिली. मगरीला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी या परिसरात गर्दी केली. परंतु लगेच वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी खात्याचे वाहन आणून पिंजऱ्यासह मगरीला ताब्यात घेतले. दरम्यान, पिंजऱ्यात सापडलेली मगर लहान आहे. आणखी दोन मगरी असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.

Advertisement
Tags :

.