भुयारी मार्गाचे काम पुर्णत्वाकडे
कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठाला पूर्व व पश्चिम भागाला जोडणारा भुयारी मार्ग, राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने साडेआठ कोटी मंजूर केले. शंभर टक्के अनुदान उपलब्धा करून दिल्याने भुयारी मार्गाचे काम वेळेत पूर्ण करता आले. सार्वजनिक बांधकाम खात्याबाबात शिवाजी विद्यापीठाने नेमलेल्या तज्ञ अभियंत्यांनी तयार केलेल्या डिझाईननुसार काम पूर्ण झाले, असून लवकरच या भुयारी मार्गाचे उद्घाटन करून लोकार्पण सोहळा केला जाणार आहे.
शिवाजी विद्यापीठातील भुयारी मार्गाने तीन मिटर उंचीपर्यंतची वाहने जावू शकतात. त्यापेक्षा जास्त उंचीची वाहने आत जावू नये म्हणून दोन्ही बाजूला गार्ड लावले आहेत. हा भुयारी मार्ग हलकी वाहने व पादचारी यांच्यासाठी आहे. पादचाऱ्यांसाठी संपूर्ण लांबीला फुटपाथ तयार केला आहे. या कामामध्ये भुयारी मार्गाचे रस्ते, फुटपाथ व जुना कोल्हापूर- बेळगाव महामार्ग यावर स्लॅप टाकताना वाहतुक व्यवस्था बिना अडथळा सुरू होती. या व्यतिरिक्त भुयारी मार्गातून जाणाऱ्या वाहनांमुळे पादचाऱ्यांना इजा होवू नये याकरिता पादचारी मार्गांच्या बाजूने रेलींग करण्यात येणार आहे. रस्त्यांच्या जंग्शनला मानकानुसार रंबलर स्ट्रिक्सची तरतूद करण्यात येणार आहे. संपूर्ण भुयारी मार्गाला रात्रीच्यावेळेला पुरेसा उजेड मिळावा याकरिता लाईटची तरतुद केली आहे. त्याला मोशन सेंसर बसवण्यात येणार असून, गाडी आल्यानंतरच लाईट लागेल. परिणामी उर्जा बचत होईल. भुयारी मार्गाचे काम बांधकाम विभागाच्या कोल्हापूर विभागामार्फत पूर्ण करण्यात आले असून, या कामाचे ठेकेदार अरिहंत कस्ट्रक्शनमार्फत केले आहे. विद्यापीठाच्या बांधकाम समितीचे तज्ञ सदस्य आर्किटेक्ट महेश डोईफोडे, इंजिनियर सदानंद सबनीस, इंजिनिअर गिरीष कुलकर्णी, रमेश पवार, अभियांत्रिकी विभागामार्फत रणजीत यादव, अमित कांबळे यांनी संपूर्ण उतकृष्ट दर्जाचे करण्यासाठी कष्ट घेतले. त्यासाठी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे व व्यवस्थापन समितीच्या सदस्यांचे मार्गदर्शन लाभले.
- भुयारी मार्गात पाणी साठणार नाही
भुयारी मार्गाला पावसाच्या पाण्याचा प्रादुर्भाव होवू नये व पाण्याचा उत्तम निचरा व्हावा यासाठी डिझाईन केले आहे. भुयारी मार्गात पाणी साचणार नाही व कितीही मोठा पाऊस आला तरी वर्षभर भुयारी मार्ग वापरासाठी उपलब्ध राहील, अशी पाणी निचरा यंत्रणा कार्यान्वित केली आहे. भविष्यात या भुयारी मार्गातून वाहून जाणारे पाणी विद्यापीठ परिसरात बांध घालून आडवण्याचा विद्यापीठ प्रशासनाचा मानस आहे.