For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोल्हापुरात दुर्मीळ कंदमुळे, औषधी वनस्पतीचे प्रदर्शन

01:31 PM Jan 16, 2025 IST | Radhika Patil
कोल्हापुरात दुर्मीळ कंदमुळे  औषधी वनस्पतीचे प्रदर्शन
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

रानकंदमुळांची, औषधी वनस्पतींची ओळख आणि त्यांचा आहारातील वापर याबाबतची माहिती शहरवासियांना आणि खेड्यापाड्यातील ग्रामस्थांना व्हावी, शेतकऱ्यांच्या त्यांची लागवड त्यांच्या शेतात करावी, या हेतूने 18 आणि 19 जानेवारी 2025 रोजी दसरा चौकातील शहाजी कॉलेजच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कंदमुळे आणि औषधी वनस्पतींचे प्रदर्शन आयोजित केली असल्याची माहिती कोल्हापुर वुई केअर संस्थेचे अध्यक्ष मिलींद धोंड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

धोंड म्हणाले, 100 हून अधिक कंदमुळांचे आणि 150 हुन अधिक औषधी वनस्पतींचे तसेच 50 पेक्षा अधिक फुलपाखरांना आकर्षित करणाऱ्या विशेष वनस्पतींचे माहितीपूर्ण असे हे प्रदर्शन असणार आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन शनिवारी (दि.18) खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते होणार असून शाहू एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मानसिंग बोंद्रे, शहाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.के शानेदिवाण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 18 जानेवारी रोजी सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत, 19 जानेवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत प्रदर्शन असणार आहे.

Advertisement

निसर्गअंकुर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर वुई केअर आणि एनजीओ कम्पॅशन 24 या संस्थेच्यावतीने तसेच शाहू छत्रपती शिक्षण संस्था, गार्डन्स क्लब कोल्हापूर, युथ ऍनेक्स, वुई केअर हेल्पलाईन या संस्थांच्या सहकार्याने तसेच कंदमुळांची ओळख आणि चांगली माहिती मिळावी म्हणून.मोहन माने यांच्या अथक प्रयत्नातून हे प्रदर्शन भरवण्यात येत प्रवेश विनामूल्य आहे.

निसर्गअंकुर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ .मधुकर बाचुळकर म्हणाले, मानवी आहारात उपयुक्त असणाऱ्या बहुतांश कंदवर्गीय वनस्पतींची शेतात लागवड केली जाते. या प्रदर्शनात सताप, गुगुळ, कुसर, कोष्ट कोलीजंन, लक्ष्मी तरु ,सागर गोटा, बेडकी पाला, अक्कल कारा, दमवेल, काजरा या दुर्मिळ औषधी वनस्पती तसेच कणगा, काटे कणग, कोराडू, करांदा, वराहकंद, वासकंद, पासपोळी, शेंडवेल, आळसी, शेवळा, सुरण अशाप्रकारच्या सुमारे 100 हुन अधिक प्रकारच्या कंदाच्या जाती प्रजातींची मांडणी या प्रदर्शनात असणार आहे.

कंदमुळांपासून विविध खाद्यपदार्थ कसे बनविले जातात. त्याच्या पाककृती या प्रदर्शनात पाहता येतील. हे खाद्यपदार्थ खाण्यासाठी उपलब्ध असतील. काही कंदमुळे विक्रीसाठी असतील. रानभाज्या, वृक्ष आणि औषधी वनस्पतींची माहिती असणारी पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध असतील. तसेच काही वनस्पतींची रोपे आपणास खरेदी करता येतील. प्रदर्शनातील कंदांचे संकलन प्रामुख्याने कर्नाटकातील जोयडा, महाराष्ट्रातील बेल्हे (पुणे) व गगनबावडा (कोल्हापूर) आणि एका भागातून करण्यात आले आहे. प्राचार्य डॉ.अशोक वाली, मंजिरी कपडेकर, सुप्रिया भस्मे, अमृता वासुदेवन, सुशिल रायगांधी, अभिजीत पाटील, सुशांत टकळक्की आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.