कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सुभाषिश बोस, सौम्या सर्वोत्तम फुटबॉलपटू

06:04 AM May 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / भुवनेश्वर

Advertisement

भारतीय फुटबॉल संघातील बचावफळीत खेळणारा मोहन बागानचा कर्णधार सुभाषीश बोस तसेच इस्ट बंगाल महिला फुटबॉल संघातील हुकमी स्ट्रायकर सौम्या गुगुलोथ यांची 2024 सालातील अनुक्रमे सर्वोत्तम पुरूष आणि महिला फुटबॉलपटू म्हणून निवड करण्यात आली.

Advertisement

सुभाषीश बोसच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षीच्या फुटबॉल हंगामात मोहन बागान संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना इंडियन सुपर लिग स्पर्धेचा दुहेरी मुकूट पटकाविला. बागान संघाने लीग स्पर्धेतील शिल्ड विजेतेपद आणि आरएलएस चषक फुटबॉल स्पर्धा जिंकली. गेल्या महिन्यात झालेल्या आयएसएल स्पर्धेतीलअंतिम सामन्यात बेंगळूर एफसीचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला. आयएसएल स्पर्धेच्या इतिहासात एकाच हंगामात दोन विजेतीपदे मिळविणारा 2020-21 नंतर मोहन बागान हा पहिला संघ आहे. 2020 साली सिटी एफसीने असा पराक्रम केला होता. 2025 सालातील सर्वोत्तम महिला फुटबॉल प्रशिकाचा पुरस्कार सुजाता करला मिळाला. ग्रिसॉन फर्नांडीस याची 2025 सालातील सर्वोत्तम उदयोन्मुख फुटबॉलपटू म्हणून निवड झाली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article