For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara Politics : सुभाष कारंडे राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत; महाबळेश्वर तालुक्यात राजकीय हालचाल

04:51 PM Nov 18, 2025 IST | NEETA POTDAR
satara politics   सुभाष कारंडे राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत  महाबळेश्वर तालुक्यात राजकीय हालचाल
Advertisement

                         महाबळेश्वर-प्रतापगड राजकारणात मोठा वळण

Advertisement

प्रतापगड : महाबळेश्वर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापवणारी आणि शक्तिसंतुलन बदलणारी मोठी घटना शनिवारी घडली. राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार गट) चे माजी तालुकाध्यक्ष सुभाष कारंडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकांमध्ये शिवसेना अधिक बळकट होण्याचे संकेत मिळत आहेत.

तालुक्यात तळागाळातील आधार, सर्वसामान्यांमध्ये मोठा संपर्क आणि कार्यकर्त्यांमध्ये दृढ पकड यामुळे सुभाष कारंडे यांना स्वतंत्र ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांशी (शरद पवार आणि अजित पवार गट) कारंडे यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे त्यांच्या पक्षांतरामुळे दोन्ही गटांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कारंडे यांच्यासोबत काम करणारे अनेक कार्यकर्तडी शिवसेनेत येण्याची चिन्हे दिसत असल्याने तालुक्यातील निवडणुकीचे गणित मोठ्या प्रमाणावर बदलण्याची शक्यता आहे.

Advertisement

महाबळेश्वर येथील हॉटेल ईश्वर इन येथे झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महाबळेश्वर-प्रतापगड राजकारणात मोठी हालचाल एकनाथ मोठी गर्दी झाली. सभागृह घोषणांनी दणाणून गेले होते. कार्यकत्यांनी कारंडे यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले. उपमुख्यमंत्री शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई सेनेचे महाबळेश्वर पूर्व तालुकाप्रमुख संभाजी भिलारे, पश्चिम तालुकाप्रमुख गणेश उतेकर, जी. के. आंब्राळे, पाचगणी शहरप्रमुख राहुल शिंदे उपस्थित होते. आमदार, पदाधिकारी, दरम्यान, सुभाष कारंडे यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिवसेना तालुक्यात अधिक आक्रमकपणे उभी राहणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट अडचणीत, शेकडो कार्यकर्त्यांचे मतस्थान बदलू शकते. आगामी निवडणुका अनिश्चिततेत, नवे आघाडीचे राजकारण सुरू होण्याची शक्यता आहे. महाबळेश्वर तालुक्यातील हा प्रवेश मोठे वळण ठरत असून, यानंतर आणखी कोणते नेते कोणत्या पक्षाकडे झुकतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना आगामी निवडणुकांत आपली ताकद अधिक प्रबळ करण्याच्या तयारीत असल्याचे या प्रवेशातून स्पष्टपणे दिसून आले.

Advertisement

.