महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पळसंब येथे विद्यार्थ्यांना मिळणार मल्लखांब प्रशिक्षण

12:22 PM Dec 10, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

श्री जयंतीदेवी सांस्कृतीक कला क्रिडा मंडळाचा उपक्रम

Advertisement

आचरा | प्रतिनिधी

Advertisement

मल्लखांब हा शारिरीक खेळ शरीराला लवचिकता आणि ताकद देतो. हीच गरज जाणून हल्लीच्या मोबाईलच्या युगात लहान मुलांना घरातून मैदानात आणण्यासाठी पळसंबमधील श्री जयंतीदेवी सांस्कृतीक कला क्रिडा मंडळाने पळसंब येथील पूर्ण प्राथमिक शाळेच्या आवारात मल्लखांब उभारून पळसंब गावात एका नव्या उपक्रमाचा प्रारंभ केला.

यावेळी मुख्याध्यापक विनोद कदम, ग्राम शिक्षण समिती अध्यक्ष रविकांत सावंत, शिक्षिका पवार मॅडम, बागवे मॅडम, मंडळाचे अध्यक्ष उल्हास सावंत, उपाध्यक्ष अमरेश पुजारे, खजिनदार वैभव परब,सचिव चंद्रकांत गोलतकर, सहसचिव शेखर पुजारे, अमित पुजारे, अक्षय परब, बबन पुजारे, हितेश सावंत, दत्तगुरु परब, रमेश मुणगेकर तसेच शाळेतील विद्यार्थीवर्ग उपस्थित होता.

यावेळी श्री जयंतीदेवी सांस्कृतीक कला क्रिडा मंडळ पळसंबचे अध्यक्ष उल्हास सावंत म्हणाले की मल्लखांब अथवा मलखांब हा एक व्यायाम प्रकार आहे. हा एक कसरतींचा खेळ प्रकारही आहे. रोजच्या सरवाने कसरती करणाऱ्याचे शरीर सशक्त बनते ,पिळदार बनते . शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत गावातील इतर मुलांनी या खेळाचा आनंद लुटावा असे आवाहन त्यांनी केले.

Advertisement
Tags :
# tarun bharat news# palsamb # aachra # malvan
Next Article