For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विद्यार्थ्यांनी ज्ञान संपादनासाठी चौकस रहावे

11:59 AM Dec 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
विद्यार्थ्यांनी ज्ञान संपादनासाठी चौकस रहावे
Advertisement

मंत्री सुभाष शिरोडकर : पार्से हायस्कूल, समूह एकचे स्नेहसंमेलन उत्साहात

Advertisement

पेडणे : विद्यार्थ्यांनी  शिक्षणाबरोबरच क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपले योगदान देऊन विद्यालयाचे, गावाचे आणि आपल्या आईवडिलांचे नाव उज्वल करावे.  सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञान युगात ज्ञान संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमी  चौकस रहावे, असे आवाहन जलस्र्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले. पार्से हायस्कूल व पार्से शाळा समूह क्रमांक एकच्या स्नेहसंमेलनात मंत्री शिरोडकर बोलत होते. व्यासपीठावर पार्से नागरिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  दयानंद सोपटे, सन्माननीय अतिथी म्हणून  भगवती देवस्थान समितीचे अध्यक्ष आदित्य देशपभू, विशेष निमंत्रित म्हणून सरपंच अजय कळंगुटकर, उपसरपंच रेश्मा कांबळी, शाळा व्यावस्थापन समितीचे अध्यक्ष राघोबा गवंडी,  व्यवस्थापक शिवाजी कळंगुटकर, मुख्याध्यापक श्रीकांत नाईक,  हर्षिता नाईक, पार्से हायस्कूल पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष नीलेश बागकर आणि पार्से हायस्कूल पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी यशवंत कानोलकर उपस्थित होते. यावेळी दहावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच समूहातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. स्नेहसंमेलनप्रसंगी मुख्यमंत्री- वशिष्ठ गुरू पुरस्कारने  चोनसाई सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या शिक्षिका हर्षिता नाईक यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.  मंत्री सुभाष शिरोडकर यांचा माजी आमदार दयानंद सोपटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  मुख्याध्यापक श्रीकांत नाईक यांनी शाळेचा वर्षभरातील कार्याचा वार्षिक अहवाल सादर केला. राघोबा गवंडी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शिवाजी कळंगुटकर  यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. शिक्षिका अग्नीरा गाड यांनी आभार मानले. नंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाले.

Advertisement
Advertisement
Tags :

.