विद्यार्थ्यांनी क्रीडाक्षेत्रात उत्तुंग कामगिरी करावी
डॉ. प्रभाकर कोरे; ‘लिंगराज’च्या विद्यार्थ्यांचे केले अभिनंदन
बेळगाव : विद्यार्थ्यांनी आशियाई क्रीडा, राष्ट्रकूल, ऑलिंपिक यासारख्या खेळांपर्यंत पोचून क्रीडाक्षेत्रात उत्तुंग कामगिरी करण्याबरोबरच देशाचे नाव जागतिक पटलावर नोंदवावे, असे आवाहन केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी केले. राणी चन्नम्मा विद्यापीठातर्फे बेळगावात झालेल्या नवव्या अॅथलेटिक क्रिडास्पर्धेत 17 विक्रम नोंदवित सलग 9व्यांदा समग्र विजेतेपद (समग्र वीराग्रणी) पटकावलेल्या केएलई संस्थेच्या लिंगराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे कार्याध्यक्ष डॉ. कोरे अभिनंदन करून बोलत होते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना केएलई संस्थेकडून सर्वप्रकारे सहकार्य करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
नेहरूनगरातील जिल्हा क्रिडांगणावर 29 व 30 नोव्हेंबर रोजी झालेल्या राणी चन्नम्मा विद्यापीठांतर्गत नवव्या अॅथलेटिक क्रिडास्पर्धेत लिंगराज महाविद्यालायाने 17 वेगवेगळ्या खेळ प्रकरात विक्रम नोंदवित सलग नवव्यांदा समग्र विजेतेपदावर (समग्र वीराग्रणी) आपले नाव कोरले आहे. पुरूष विभागात 14 सुवर्ण, 2 कांस्य व महिला विभागात 8 सुवर्ण, 5 रौप्य, 3 कांस्य पदके मिळविली. पुऊष विभागात वैयक्तिक समग्र विजेतेपद भूषण पाटील व महिला विभागात वैयक्तिक समग्र विजेतेपद वैभवी बुद्रुकने मिळविले. क्रिडापटुनी पहिल्यांदाच 17 नवे विक्रम करीत इतिहास घडविला आहे.
100 मीटर धावणे (पुरुष) भूषण पाटील, 100 मीटर धावणे (महिला) वैभवी बुद्रुक, 100 व 200 मीटर अडथळा शर्यतीत (महिला) अपूर्वा नायक, 110 मीटर अडथळा (पुरुष) संजय नायक, 200 व 400 मीटर धावणे (पुरुष) श्रीनाथ दळवी, 5 हजार मी धावणे (पुरुष) विजय सावतकर, साखळी गोळाफेक (पुरुष) चन्नवीरेश हिक्कीमठ, साखळी गोळाफेक (महिला) स्पृहा नाईक, भालाफेक (पुरुष) शशांक पाटील, 400 बाय 100 रिले (महिला), 400 बाय 400 मिक्स रिले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हनुमंत मेलीनमनी, क्रीडासंचालक डॉ. सी.रामाराव व जिमखाना उपाध्यक्ष विनायक वरूटे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.