Solapur : वारकऱ्यांसाठी स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी बनले ‘जलदूत
कार्तिकी यात्रेत स्वेरीच्या एनएसएस विद्यार्थ्यांचा उपक्रम ठरला कौतुकास्पद
पंढरपूर : कार्तिकी बारीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीच्या भेटीसाठी आतूर झालेल्या आणि दर्शन रांगेत तासनतास उभ्या असलेल्या वारकऱ्यांची तहान स्वेरीचे विद्यार्थी शुद्ध पाणी देऊन भागवत आहेत. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार यांच्या सहकार्याने व स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा उपक्रम उपप्राचार्या डॉ. मीनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली इंजिनिअरिंगचे विद्यार्थी, विभागप्रमुख, प्राध्यापक हे पाणी वाटप करत आहेत.
स्वेरीचे सचिव डॉ. सूरज रोंगे यांच्या हस्ते रिद्धी-सिद्धी मंदिराजवळ पाणी वाटपाच्या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. पाणी वाटपाच्या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, संस्थेतील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी पाणी वाटप करत आहेत. डॉ. महेश मठपती, प्रा. अमोल चौंडे, प्रा. महुवा बिस्वास, इतर सहकारी, प्राध्यापक व विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.
स्वेरीकडून दररोज साधारण आठ ते दहा हजार लिटर पाण्याचे वाटप केले जात आहे. प्रत्येक दिवशी चार प्राध्यापक व जवळपास २५ विद्यार्थी दिवसभर मोफत शुद्ध पाणी बाटप करत आहेत.