आषाढी एकादशीनिमित्त सुळगा (हिं.) सरकारी मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी काढली दिंडी
उचगाव : सुळगा (हिं.) येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक आणि गावातील पालक, ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य अशी आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीचा शुभारंभ शाळेच्या प्रांगणातून करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वारकरी संतांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. शाळेच्या पटांगणातून या दिंडीचा शुभारंभ मुख्याध्यापक एल. एस. चांदीलकर आणि पालक प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. विठ्ठल रखुमाई तसेच तुकाराम महाराज, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, चोखामेळा, जनाई यांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. विद्यार्थी, विद्यार्थिनी नटूनथटून आकर्षक वेशभूषामध्ये शाळेत गेले होते. याबरोबरच त्यांच्यासोबत पालकांचाही सहभाग होता. सदर वारकरी दिंडी गावातील प्रत्येक गल्लीमध्ये विठ्ठलनामाचा जयघोष करत गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये या दिंडीचे आगमन झाल्यानंतर मंदिरातील विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये यथासांग पूजा शाळेतील शिक्षक व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.