For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

येळ्ळूर विभागीय स्पर्धेत नंदिहळ्ळीचा डंका

10:27 AM Aug 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
येळ्ळूर विभागीय स्पर्धेत नंदिहळ्ळीचा डंका
Advertisement

बेळगाव : नुकतीच येळ्ळूर येथे झालेल्या विभागीय क्रीडा स्पर्धामध्ये माध्यमिक विद्यालय नंदिहळ्ळी येथील विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन केले आहे. वैयक्तिक, सांघिक अशा प्रकारात त्यांनी यश संपादन केल्यामुळे गावचे नाव उज्वल झाले. त्यांच्या या यशामुळे ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक होत आहे. नंदिहळ्ळी येथील माध्यमिक शाळेमध्ये खेळाडूंनी मुलींनी कबड्डी संघिक स्पर्धेमध्य क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक घेतला आहे. तर वयक्तिक 3000 मी. धावणेमध्ये प्रथम, 1500 मी. प्रथम, 800 मी. प्रथम, योगासनमध्ये प्रथम, 51 किलो वजनी गटामध्ये कुस्तीमध्ये प्रथम, भालाफेकमध्ये द्वितीय क्रमांक, 14 वर्षाखालील खेळाडू  भालाफेकमध्ये प्रथम, गोळाफेकमध्ये प्रथम, लांबउडीमध्ये तृतीय क्रमांक, असे अनेक नंबर पटकाविले आहेत. यामधील अनेक खेळाडूंची तालुकास्तरीय स्पर्धांसाठी निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंना मुख्याध्यापक व सर्व सहकारी, क्रीडा शिक्षक एस. एम. कोलकार यांचे मार्गदर्शन तर ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.