Satara : जायगावमधील विद्यार्थ्यांना पोस्टाचे व्यवहार मिळाले अनुभवायला..!
पोस्टमास्तर संचिता कदम यांचा सहावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद
औष : पोस्टात पैसे कुठून येतात, मनी ऑर्डर कशी करतात, पत्राचे किती प्रकार आहेत, ऑनलाईन व्यवहार कसे होतात, बिमा कुणाचा काढता येतो, बचत खात्यात पैसे कसे भरायचे, कसे काढायचे या सर्व प्रश्नांची उत्तरे यशवंतराव चव्हाण हायस्कूल जायगाव (ता. खटाव) येथील सहावीच्या विद्यार्थ्यांना मिळाली. पोस्टमास्तर संचिता कदम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
पुस्तकातील डाकघर पाठातील ज्ञान पुरेसे होणार नाही. यामुळे वर्गशिक्षक फिरोज मुलाणी यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यप्न पोस्टात नेत पोस्टातील कामकाज तसेच तेथील व्यवहार याचा अनुभव देण्याचा निश्चय केला. जायगाव येथील पोस्ट ऑफिस मध्ये पोस्टमास्तर संचिता कदम यांनी विद्याथ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले. विद्यार्थ्यांनी पोस्टातील सुकन्या समृद्धी योजना कशी चालते याची माहिती घेतली. साधे पत्र, स्पीड पोस्ट, रजिस्टर पत्र याची माहिती जाणून घेतली.
पोस्टातील ऑनलाईन प्रणालीची माहिती पोस्टमास्तर कदम यांनी दिली. फिरोज मुलाणी यांनी आभार मानले.सर्वांगीण विकासाला प्रेरणा मिळेल पोस्टातील चालणाऱ्या विविध व्यवहाराची माहिती विद्याथ्यर्थ्यांना या उपक्रमातून अनुभवता आली. उपक्रमामुळे त्यांच्या व्यावहारिक ज्ञानात भर पडली असून पोस्टल सिस्टमबद्दलची समज अधिक दृढ झाली आहे.