बेळगावातील विद्यार्थ्यांचा एमबीबीएससाठी रशियाकडे प्रवास
एसबीईएसतर्फे पहिली प्री-डिपार्चर बैठक
बेळगाव : शाईन ब्राईट एज्युकेशनल सर्व्हिसेस (SBES) या शैक्षणिक संस्थेने वैद्यकीय शिक्षणाची स्वप्ने पूर्ण करू इच्छिणाऱ्या स्थानिक विद्यार्थ्यांसाठी मोलाचे पाऊल उचलले आहे. एसबीईएसतर्फे बेळगाव येथे प्रथमच प्री-डिपार्चर ओरिएंटेशन मिटींग आयोजित करण्यात आली. या बैठकीत ऑक्टोबर महिन्यात ओम्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, रशिया येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. बेळगाव जिह्यातील इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी एमबीबीएससाठी रशियाची निवड करत आहेत. जवळपास 10 ते 12 विद्यार्थी ओम्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये दाखल झाले असून डॉ. सुरज अनगोळकर आणि त्यांच्या समर्पित SBES टीमच्या मार्गदर्शनाखाली हे विद्यार्थी लवकरच रशियाकडे प्रयाण करणार आहेत.
या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पालकांनी डॉ. अनगोळकर यांचे सततचे मार्गदर्शन, सुरळीत कागदपत्र प्रक्रिया आणि 100 टक्के यशस्वी प्रवेशाची खात्री याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनीही आपले अनुभव मांडले व सांगितले की, एमबीबीएस परदेशात शिकण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांनी डॉ. सुरज अनगोळकर आणि शाईन ब्राईट एज्युकेशनल सर्व्हिसेसच्या टीमवर पूर्ण विश्वास ठेवावा. या पहिल्या बॅचसह एसबीईएसने बेळगावात एक नवा टप्पा गाठला आहे. अधिक माहितीसाठी खालील नंबरवर किंवा संकेतस्थळाला भेट द्या. 91-9019949143 http://www.Wesstudyabroad.com