Sangli : सांगलीत विद्यार्थ्यांनी लुटला पक्षी निरीक्षणाचा आनंद !
पलूस तालुक्यात विद्यार्थ्यांसाठी अनोखी पक्षी निरीक्षण शाळा
पलूस : राज्य पश्नी सप्ताह निमित्त पलूस तालुक्यात एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. नेहमीच्या शालेय अभ्यासाच्या चौकटीतून बाहेर पडत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पद्मानगर (पलूस) व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेघर बसाहत पलूस येथील विद्यार्थ्यांनी इंगळे पाझर तलावावर पक्षी निरीक्षणाचा मनसोक्त आनंद घेतला. पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश कदम यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी आढळणाऱ्या विविध पक्ष्यांचे निरीक्षण केले. त्यांच्या नोंदी घेतल्या. या पश्नी निरीक्षणादरम्यान ठिबकेदार तुतवार, कंटेरी चिकल्या आणि पांढरा धा-बी यांसारख्या स्थलांतरित पक्ष्यांची महत्त्वपूर्ण नोंद घेण्यात आली, ज्यामुळे या तलावाचे पक्ष्यांसाठीचे तलावाकाठी महत्त्व अधोरेखित झाले.
यावेळी पलूस पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे, पलूस केंद्राचे केंद्रप्रमुख संजय डोंगरे, जिल्हा परिषद शाळा पलूस नं १ चे माजी मुख्याध्यापक राम चव्हाण, जल्हा परिषद शाळा, पद्मानगर (पल्-तूस) शाळेचे मुख्याध्यापक महेशकुमार चौगुले, जिल्हा परिषद शाळा आंबेघर शाळेचे मुख्याध्यापक बाबासाहेब लाड, जिल्हा परिषद शाळा आंब-'घर येथील उपशिक्षक अजय काकडे उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना निसर्ग आणि पक्ष्यांबद्दल गोडी निर्माण झाली त्यांना पर्यावरण शिक्षणाचे प्रत्यक्ष धडे मिळाले.