कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Miraj : मिरजेत रोप वायरचा गळफास लागून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

03:42 PM Nov 20, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                            सायकल लॉकच्या वायरमुळे शाळकरी मुलाचा दुर्दैवी अंत

Advertisement

मिरज : शहरातील बाळवे गल्ली, पाण्याच्या टाकीजवळ सायकलला लॉक करण्यासाठी असलेल्या कुलूपाच्या रोप बायरचा गळफास लागून अमोल संजय मळवाडे (वय १४) या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Advertisement

घरातील लोखंडी जिन्याला सदर बायर अडकवली होती. क्लास जाण्यापूर्वीच तो वायरमध्ये अडकला अन् त्याचा मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत मिरज शहर पोलिसात नोंद आहे. मयत अमोल मळवाडे हा शहरातील एका शाळेत इयत्ता नववीत शिकत आहे. मंगळवार दुपारी तो मित्रांसोबत क्लासला जाणार होता. तत्पूर्वी दप्तर आणण्यासाठी तो घरी गेला.

घरातील लोखंडी जिन्याला त्याच्या सायकलच्या कुलूपाची रोप वायर अडकवली होती. दप्तर घेऊन जाताना जिन्यावरील रोप वायर त्याच्या गळ्यात अडकली. यात त्याचा मृत्यू झाला. अमोल हा उशिरापर्यंत सायकल आणि दप्तर घेऊन क्लास जाण्यासाठी येत नसल्याने त्याचे अन्य मित्र घरी आले. बऱ्याच उशिरापर्यंत आवाज देऊनही अमोल हा प्रतिसाद देत नव्हता. शेजाऱ्यांनी घरात जावून बघितल्यानंतर अमोल रोप वायरमध्ये गळफास लागलेल्या अवस्थेत मिळून आला.

तातडीने त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला आहे. याबाबत शहर पोलिसात नोंद असून, अधिक तपास सुरू आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatSocialMediamaharastrasanglisangli childsangli news
Next Article