मजबूत श्रीलेकंचा सामना आज हाँगकाँगशी
वृत्तसंस्था/ दुबई
आज सोमवारी येथे हाँगकाँगशी होणाऱ्या सामन्यात श्रीलंकेचा संघ आशिया कपमधील त्यांच्या परिपूर्ण सुऊवातीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. गेल्या वेळी टी-20 स्वरूपात झालेला आशिया कप जिंकणाऱ्या श्रीलंकेने बांगलादेशविऊद्धच्या सामन्यात सर्व बाजूंनी सरस कामगिरी करत विजय मिळवला.
पॉवरप्लेमध्ये बळी घेण्यापासून ते पहिल्या सहा षटकांत फलंदाजीने सामना आपल्या दिशेने वळविण्यापर्यंत श्रीलंकेने आठ संघांच्या स्पर्धेतील ताकदवान संघांना इशारा दिला आहे. त्यांचा सामना आता हाँगकाँगशी होत आहे, जो सलग दोन सामने गमावलेला संघ आहे आणि त्यांच्या फलंदाजांना मजबूत प्रतिस्पर्ध्यांविऊद्ध टिकून राहणे कठीण जात आहे. त्यांचा फलंदाजीतील संघर्ष लक्षात घेता सामना चुरशीचा बनविण्यासाठी श्रीलंकेविऊद्ध त्यांना मोठ्या प्रमाणात सुधारणा कराव्या लागतील. नुवान तुषारा आणि दुष्मंथा चामिरा या वेगवान जोडीविऊद्ध हाँगकाँगच्या नाजूक वरच्या फळीला उभे राहणे कठीण जाऊ शकते.
जर यासिम मुर्तझाच्या नेतृत्वाखालील संघ पॉवरप्लेमध्ये त्यांचा सामना करू शकला, तर पुढे फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगा याला तोंड देणे हे एक कठीण काम ठरू शकते. शेवटच्या षटकांतील तज्ञ मथेशा पाथिराना बांगलादेशविऊद्ध सुरात नव्हता आणि तो यॉर्कर्सचा जोरदार मारा करून विरोधी संघाला नमवण्यास उत्सुक असेल. फलंदाजीच्या आघाडीवर श्रीलंकेची पथुम निस्सांका, कुसल मेंडिस आणि कामिल मिशारा यांचा समावेश असलेली वरची फळी त्यांच्या दिवशी विध्वंसक ठरू शकते.
हाँगकाँगच्या संघातील काही फटकेबाजांपैकी एक असलेल्या मुर्तझाला माहित आहे की, त्याच्या फलंदाजांना कुठे काम करावे लागेल. तथापि, बांगलादेशविऊद्धच्या मागील सामन्यात त्यांच्या गोलंदाजांनी मोठी सुधारणा दाखवली. हाँगकाँगचे सलामीवीर झीशान अली आणि अंशुमन रथ आतापर्यंत निराशाजनक कामगिरी करत आले आहेत आणि जर त्यांच्या संघाला आणखी चांगली कामगिरी करायची असेल, तर त्यांना पॉवरप्लेमध्ये धावा काढाव्या लागतील.
संघ-श्रीलंका : चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निस्सांका, कुसल मेंडिस, कुसल पेरेरा, नुवानिदु फर्नांडो, कामिंदू मेंडिस, कामिल मिशारा, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, चमिका कऊणारत्ने, महेश थीक्षाना, दुष्मंथा चामिरा, बिनुरा फर्नांडो, नुवान तुषारा, मथीशा पाथिराना.
हाँगकाँग: यासीम मुर्तझा (कर्णधार), बाबर हयात, झीशान अली, निझाकत खान, नसऊल्ला राणा, मार्टिन कोएत्झी, अंशुमन रथ, कल्हन छल्लू, आयुष शुक्ला, एजाझ खान, अतीक इक्बाल, किंचित शाह, आदिल मेहमूद, हारून अर्शद, अली हसन, शाहीद वासिफ, मोहम्मद गझनफर, मोहम्मद वहिद, अनस खान, एहसान खान.
सामन्याची वेळ : रात्री 8 वा.