For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तालुक्यात पुष्य नक्षत्राची जोरदार सलामी

11:27 AM Jul 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
तालुक्यात पुष्य नक्षत्राची जोरदार सलामी
Advertisement

पावसाचा जोर वाढला : तालुक्यातील नदी-नाले तुडुंब : शिवारांमध्ये साचले पाणी

Advertisement

वार्ताहर /किणये

तालुक्यात म्हाताऱ्या पावसाने जोरदार सलामी दिली आहे. शुक्रवार दि. 19 रोजी पासून पुष्य नक्षत्राला अर्थातच म्हाताऱ्या पावसाला सुऊवात झाली आहे. शुक्रवारी व शनिवारी पावसाचा जोर वाढला असून सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. तालुक्यातील नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. शेत शिवारात पूर्णपणे पाणी साचले आहे. हवामानात कमालीचा बदल झाला असून गारवा निर्माण झाला आहे. तालुक्यात गेल्या पाच सहा दिवसांपासून संततधार पाऊस सुरूच आहे. तर शुक्रवारपासून पावसाने अधिक जोर घेतला आहे. शेत शिवारात अधिक पाणी साचले असल्यामुळे पाणथळ शिवारामधील रोप लागवड खोळंबलेली आहे.किणये-संतिबस्तवाड परिसरातील मुंगेत्री नदी दुथडी भरून वाहू लागली आहे

Advertisement

मुसळधार पावसामुळे सिद्धेश्वर गल्ली पिरनवाडी येथील काही जणांच्या घरात पाणी शिरले होते. तसेच पाटील गल्ली येथील दुकानांमध्ये पाणी गेले होते. हे पाणी काढताना नागरिकांची बरीच तारांबळ उडाली होती. मच्छे गावातील काही गल्ल्यांमधील गटारीमधून पाण्याचा योग्यप्रकारे निचरा होत नसल्यामुळे काही जणांच्या घरात थेट पाणी शिरले. यामुळे नागरिकांची धावपळ सुरू झाली होती. या पावसामुळे नदी-नाले ओव्हरफ्लो झाले आहेत. असाच पाऊस सुरू राहिल्यास येत्या दोन दिवसात संतिबस्तवाड येथील मुंगेत्री नदीवरील जुना पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. शनिवारी दिवसभर तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाच्या सरी बरसत होत्या. बऱ्याच ठिकाणी रस्त्यावरही पाणी आले होते. मुसळधार पावसामुळे शनिवारी मात्र बऱ्याच शेतकऱ्यांनी रोप लागवडीची कामे थांबवली होती. तर कमी पाणी साचलेल्या शेतात रोप लागवड करण्यात येत होती.

Advertisement
Tags :

.