कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Karad municipal election : मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांचा जोरदार प्रतिसाद !

05:00 PM Nov 17, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                   मलकापूर नगराध्यक्षपदासाठी ४, तर नगरसेवकपदासाठी २० अर्ज दाखल

कराड
: मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रियेला रविवारी जोरदार प्रतिसाद मिळाला. सुट्टीचा दिवस असूनही उमेदवार, कार्यकर्ते व समर्थकांनी निवडणूक कार्यालयात मोठी गर्दी केली. आज एकाच दिवशी नगराध्यक्षपदासाठी चार आणि नगरसेवकपदासाठी २० उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीची चुरस बाढली आहे.

Advertisement

नगरपालिकेच्या ११ प्रभागांसाठी विविध पप्नांचे तसेच अपन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. महिलांसाठी राखीव प्रभागांमध्ये विशेषतः भाजप आणि अपन उमेदवारांची उपस्थिती लक्षणीय होती. नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून भास्कर सोळवंडे व अरुणकुमार सकटे, काँग्रेसकडून संजय तहाके व राष्ट्रवादीतर्फे मुकुंद माने या चौघांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले.

Advertisement

नगरसेवकपदासाठी प्रभाग १ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला कांचन लोहार (अपक्ष), प्रभाग २ सर्वसाधारण महिला वैदेही पवार (भाजप), विजया सूर्यवंशी (भाजप), विजया सूर्यवंशी (अपक्ष), कल्याणी सूर्यवंशी (अपक्ष), सर्वसाधारण विक्रम चव्हाण (भाजप), प्रभाग ३ नागरिकांचा मागास प्रवर्ग राजू मुल्ला (भाजप), प्रभाग ४ सर्वसाधारण महिला आनंदी शिंदे (भाजप), प्रभाग ५ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला नयना वेळापुरे (भाजप), राजश्री पोतदार (भाजप), प्रभाग ६ अनुसूचित जाती महिला उषा वाघमारे (भाजप),

सर्वसाधारण अधिकराव बागल (भाजप), प्रभाग ७ सर्वसाधारण आनंद बागल (भाजप), अंजली रैनाक (भाजप) प्रभाग ८ सर्वसाधारण अक्षय पाटणकर (अपक्ष), प्रभाग ९ नागरिकांचा मागास प्रवर्ग भारत जंत्रे (भाजप), सर्वसाधारण महिला कल्पना काळे (भाजप), प्रभाग १० नागरिकांचा मागास प्रवर्ग आरती गावडे (भाजप), प्रभाग ११ सर्वसाधारण महिला सुप्रिया मोहिते (राष्ट्रवादी) सर्वसाधारण महेश मोहिते (अपक्ष) आदींनी अर्ज दाखल केले.

आजच्या अर्ज दाखल प्रक्रियेमुळे निवडणूक बाताबरण तापू लागले आहे. उद्या आणखी उमेदवार मैदानात उतरतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, निवडणूक प्रशासन संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व सुरळीतपणे पार पडण्यासाठी सज्ज असल्याचे सांगत आहे.

Advertisement
Tags :
#Congress candidates#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaBJP candidatesCouncilor candidatesMalakapur election candidatesMayor electionNCP candidatesReserved seats for women
Next Article