कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अँथम बायोसायन्सेसच्या समभागाला दमदार प्रतिसाद

06:58 AM Jul 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

समभाग 26 टक्के प्रिमीयमसह लिस्ट

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

अँथम बायोसायन्सेसचा समभाग सोमवारी शेअरबाजारात जोरदारपणे सुचीबद्ध झाला. कंपनीचा समभाग बीएसईवर 723 रुपये प्रति समभाग याप्रमाणे खुला झाला. 570 रुपये इतकी समभागाची इशु किंमत होती, त्या तुलनेत 26 टक्के वाढीसह कंपनीचा समभाग बाजारात लिस्ट झाला. याबाबतीत पाहता रिटेल गुंतवणूकदारांना प्रत्येक लॉटवर 3979 रुपयांचा उत्तम नफा प्राप्त करता आला आहे.

63 पट इशु सबस्क्राइब

समभागाची इशु किंमत कंपनीने 540-570 रुपये प्रति समभाग अशी ठेवली होती, एका लॉटमध्ये 26 समभाग होते. या आयपीओच्या माध्यमातून कंपनीने 3395 कोटी रुपये उभारण्याचा मानस केला आहे. सार्वजनिक इशुला एकुण 2,81,45,24,128 समभागांसाठी बोली लावण्यात आली होती. इशु 63 पट ओव्हरसब्रस्क्राइब झाला होता. यात पात्रताधारक संस्थात्मक गुंतवणूकदारांची भागीदारी अधिक आहे. हा आयपीओ बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 42 पट आणि रिटेल गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद नोंदवत 5.64 टक्के आयपीओ सबस्क्राइब केला.

मारुती सुझुकीने वाढवल्या कार्सच्या किमती

नोएडा : भारतातील दिग्गज कार निर्माती कंपनी मारुती सुझुकीने आपल्या 2 कार्सच्या किमती वाढवल्याची माहिती मिळते आहे. कंपनीने ही वाढ आपल्या इर्टिगा व बलेनो या दोन मॉडेलवर केली असल्याचे समजते. 0.5 टक्के ते 1.4 टक्के इतकी किंमतीत वाढ केली असून अर्टिगा, बलेनो मॉडेलमध्ये नव्या नियमानुसार 6 एअरबॅग्ज समाविष्ट केल्या आहेत.

सदरच्या दोन्ही मॉडेलच्या किमती 16 जुलैपासून वाढवल्या आहेत. बलेनोची किमत 6.7 लाख रुपयांपासून सुरु होते तर इर्टिगाची 8.97 लाख रुपये पासून किंमत सुरु होते.

जूनमध्ये 1.68 लाख कार्सची विक्री

याचदरम्यान मारुती सुझुकीने जून 2025 मध्ये एकंदर 1.68 लाख कार्सची विक्री केली आहे. वर्षाच्या आधारावर पाहता विक्रीत 6 टक्के घट आहे. जून 2024 मध्ये मारुतीने 1.79 लाख कार्स विक्री केल्या होत्या.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article